Kanchan Nayak | Photo Credits: Subodh Bhave Twitter Account

मनोरंजन विश्वामध्ये हराहुन्नरी कलाकारांच्या एकामागोमाग एक निधनाच्या बातम्या धडकत आहे. यामध्ये आज पुण्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक (Kanchan Nayak) यांचे निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत. ‘कळत नकळत’ (Kalat Nakalat) हा त्यांचा गाजलेला सिनेमा होता. दरम्यान यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कांचन नायक यांच्या निधनाचे वृत्त समजताच सुबोध भावे, माजी मंत्री विनोद तावडे यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

विवाहबाह्य संबंधावर आधारित ‘कळत नकळत’हा सिनेमा स्मिता तळवलकर यांची निर्मिती होता. या चित्रपटात विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अशोक सराफ, अश्विनी भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या. कळत नकळत प्रमाणेच‘विश्वनाथ एक शिंपी’ या चित्रपटासाठी त्यांना मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

सुबोध भावे याची आदरांजली

डॉ. जब्बार पटेल, राजदत्त, दिनकर पाटील आदी दिग्दर्शकांसाठी त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. दरम्यान सिनेमा, मालिकांसोबतच त्यांनी ड्रॉक्युमेंट्री साठी देखील काम केले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर आता कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे.