कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) महाभयंकर संकटात समाजातील विविध स्तरातून अनेक प्रकारची मदत केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत शक्य तितके योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्यानंतर अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. यात आता मराठी कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सई ताम्हणकर (Sai Tamhankar) यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (CM relief fund) ठराविक रक्कम जमा करुन आपले योगदान दिले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. सोनालीने पोस्टमध्ये लिहिले की, "हातावर पोट असणाऱ्यांसाठी काहीतरी करावंस वाटतंय म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत यथाशक्ती रक्कम जमा केली आहे. मात्र त्यावर चर्चा नको म्हणून रक्कम सांगत नाही." ही रक्कम गरजूंपर्यंत पोहचावी अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली आहे.
सोनाली कुलकर्णी पोस्ट:
अमृता खानविलकर:
अमृता खानविलकर हिने देखील कोरोनाच्या लढ्यात मदत म्हणून आपले योगदान दिले आहे. तसंच तुम्हीही या कठीण प्रसंगात गरजूंना मदत करा असे आवाहनही तिने केले आहे.
अभिनेत्री सई कुलकर्णी हिने देखील 1.5 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. यापूर्वी सर्व मराठी कलाकारांनी एकत्रित येऊन कोरोना व्हायरसच्या संदर्भात जागृती करणारा एक खास व्हिडिओ शेअर केला होता. त्याद्वारे प्रेक्षकांना घरी सुरक्षित राहण्याचे आणि स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले होते.