Amruta Fadnavis यांच्या 'तिला जगू द्या' गाण्यावरून महेश टिळेकर आणि अभिनेता आरोह वेलणकर यांच्यात 'Facebook War'
Aroh Velankar, Mahesh Tilekar, Amruta Fadnavis (Photo Credits: Facebook, Instagram)

भाऊबीजेचे औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी 'तिला जगू द्या' (Tila Jagu Dya) हे गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित केले. अमृता फडणवीसांच्या आवाजातील या गाण्यावर अनेकांनी टिका केली तर अनेकांनी कौतुक देखील केले. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका करत अमृता फडणवीस यांना खडे बोल सुनावले. तिला गाऊ नको द्या असे म्हणत त्यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केली. यावर अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Velankar) यांनी टिका करत मराठी तारका सारखा कार्यक्रम करणारे तुम्ही एका स्त्री बद्दल कसली भाषा करत तुमची पोस्ट वाचून लाज वाटली असे फेसबुकला पोस्ट केली आहे. आरोहच्या या टिकेला महेश टिळेकर यांनी देखील सडकून टिका केली आहे. . "जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय, तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन," असं महेश टिळेकर म्हणाले.

महेश टिळेकर यांनी 'गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही' असे आपल्या पोस्टमध्ये म्हणत अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका केली होती.

हेदेखील वाचा- अमृता फडणवीस यांचे तिला जगू द्या हे गाणे ऐकून 'हिला नको गाऊ द्या' असे म्हणत महेश टिळेकरांनी केली कडक शब्दांत टिका, सोशल मिडियावर केली भली मोठी पोस्ट

आरोह वेलणकर याने केलेली टिका

ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे! फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं! सुधरा...राहीला प्रश्न मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू! अशा शब्दात आरोहने टिळेकरांवर टिका केली आहे.

महेश टिळेकर यांचे आरोहला उत्तर

Aroh Velankar बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय.कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार.. आधी स्वतः चे करिअर बघ. अशा शब्दांत भली मोठी पोस्ट महेश टिळेकर यांनी केली आहे.