अनिकेत विश्वासराव याची पत्नी स्नेहा हिची अभिनेत्यासह सासरच्या विरोधात कौंटुबिक हिंसाचार प्रकरणी पोलिसात धाव
Aniket Vishwasrao and Sneha Chavan (Photo Credits-Instagram)

मराठी सिनेमा 'लाल इश्क' मधील अभिनेत्री स्नेहा चव्हाण (Sneha Chavan) हिने पती आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) याच्या विरोधात पोलिसात धाव घेतली आहे. अभिनेत्रीने तक्रारीत असे म्हटले की, अनिकेत याने शारिरीक हल्ला आणि शिवीगाळ केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा हिने पुणे येथील अलंकार पोलीस स्थानकात तक्रार केली आहे,

तक्रारीत पुढे स्नेहा हिने म्हटले की, या सर्व प्रकारात तिच्या सासरच्या मंडळींचा सुद्धा समावेश आहे. सासू-सासरे यांनी सुद्धा तिला मारहाण करायचे. या व्यतिरिक्त तिला कथित जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली गेली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीत स्नेहा हिने असे ही सांगितले अनिकेत याला तिला फिल्म इंडस्ट्रीच्या यशामुळे द्वेश यायचा. त्याचसोबत तिचा वारंवार इतरांसमोर अपमान केला जायचा. अनिकेत याचे वडिल चंद्रकांत विश्वासराव आणि आई अदिती विश्वासराव हे दोघे अनिकेत याला त्याच्या वागणूकीत नेहमी पाठिशी घालत होते.(कंगणाच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर ज्येष्ठ अभिनेते 'विक्रम गोखलें'कडून समर्थन, वाचा काय म्हणाले..)

याआधी अनिकेत विश्वासराव हा त्याच्या लव्ह लाइफमुळे खुप चर्चेत होता. त्याचे हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री पल्लवी सुभाष हिच्यासोबत आठ वर्ष रिलेशनशिप होते. मात्र त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. त्या दोघांनी एकत्रित ठरवून वेगळे होण्याचे ठरविले होते. त्यानंतर  अनिकेत याने स्नेहा चव्हाण हिच्या सोबत 2018 मध्ये लग्न केले. या कपल्स बद्दल ही चर्चा झाल्या. पण त्याच्या आताच्या या कृत्याबद्दल सर्वांनाच धक्का बसला आहे.