अक्षय बर्दापूरकर: मराठी सिनेमांना गरज दर्जेदार पॅकेजिंगची!
Akshay Bardapurkar | (Photo Credits-file image)

मराठी सिनेमा प्रादेशिक असूनही जगभर चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे त्याच्या कसदार विषयामुळे. कलाकार कोण आहेत त्यापेक्षा विषय काय आहे, यामुळे मराठी सिनेमाला 'लोकाश्रया'ची भीती नाही. पण ही परिस्थिती सर्रास महाराष्ट्रातील नाही. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मेट्रो सिटीजच्या पालिकडे सुसज्ज थिएटर्स नसल्यामुळे म्हणा किंवा सिनेमांचं प्रमोशनचं जात नसल्याने रसिक मराठी सिनेमांपासून दूर आहेत. पण आजचं युग डिजिटल मीडियाचं आहे. आज सोशल मीडियात एका क्लिकवर जगाच्या कोणत्याही टोकावरील माहिती मिळते. मग मराठी सिनेमा का पोहचू शकत नाही? हा विचार घेऊन अक्षय अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) पुढे आले.

अक्षय बर्दापूरकर हे नाव आज 'प्लॅनेट मराठी'मुळे घराघरात पोहचलं आहे. देशा-परदेशात 'मराठी'ला तीचा सन्मान मिळावा म्हणून अक्षय पुढे आले आहेत. मराठी सिनेमा दर्जेदार आहे, प्रमोशन कडक आहे पण मार्केटिंगच्या आजच्या जमान्यात 'पॅकेजिंग' मध्ये मराठी सिनेमा मागे पडत आहे आणि फक्त सिनेमाच कशाला? अनेक मराठी कलाकार, राजकारणी, समाजात भरीव कामगिरी करणारी व्यक्तिमत्त्व योग्य 'पॅकेजिंग' च्या अभावामुळे जगासमोर योग्य प्रकारे येऊ शकली नाहीत.

अक्षय स्वतःला तीन p चं समीकरण समजतात, Politician, producer and philantropher. आज जगाच्या टोकावर विविध क्षेत्रात मराठी माणसं काम करत आहेत पण ते जगासमोर 'रिअल टाईम 'मध्ये आणण्यासाठी एका मराठमोळ्या दुव्याची गरज आहे. सध्या काही अंशी 'प्लॅनेट मराठी'च्या रूपात अक्षय बर्दापूरकर ती पूर्ण करत आहे. लेटेस्टली मराठी सोबत बोलताना त्यांच्या

याच वाटचाली बद्दल त्यांनी माहिती दिली. आज मराठी सिनेमे सुरेख बनत आहेत पण पॅकेजिंगच्या अभावी बॉलिवूडसमोर ते क्वचितच तग धरू शकतात. यासाठी आता तो रसिकांसमोर खास आणि हटके अंदाजात आणणं गरजेचे आहे. त्यासाठी अधिक काम करत असल्याचं अक्षयने सांगितले आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला असो किंवा जगाच्या दुसऱ्या टोकावर प्रतिकूल स्थितीवर मात करून स्वतःच नाव कोरणारा मराठी माणूस असो त्याच्या यशोगाथेची दखल आधी आपण 'मराठी' म्हणून घेतली पाहिजे. लोकल टॅलेंटला केवळ मीडियात नव्हे तर ज्या स्वरूपात शक्य आणि आवश्यक आहे अशा स्वरूपात मदत पुरवण्यासाठी अक्षय बर्दापूरकर काम करत आहेत. त्यांच्या या वाटचालीला लेटेस्टी कडून खूप खूप शुभेच्छा!