Nipun Dharmadhikari Birthday Special: दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी ला अमेय वाघ च्या Netflix वरील आगामी Mismatched शो च्या धर्तीवर हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Amey Wagh And Nipun Dharmadhikari | Photo Credits: Instagram

मराठी वेबविश्वामध्ये अमेय वाघ (Amey Wagh) आणि निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari ) ही जोडगोळी लोकप्रिय आहे. त्यापैकी आज निपूणच्या वाढदिवसानिमित्त त्याचा खास मित्र अमेय वाघने हटके अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान निपुणचा नेटफ्लिक्सवर 'मिस मॅच' हा आगामी शो येणार आहे. त्याचा संदर्भ देत एक मजेशीर मॉर्फ केलेला फोटो शेअर करत खास उखाण्यामध्ये निपुणला अमेयने बर्थ डे विश केले आहे. 'गोर्‍या गोर्‍या हातात beer चा ग्लास ...सगळा mass म्हणतो आमचे धनी top class ! Happy Birthday धनी' असं खास अंदाजात अमेयने निपुणला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान भाडिपा या युट्युब चॅनेलवर ' कास्टिंग काऊच विथ अमेय- निपुण' हा शो खास गाजला. तेव्हापासून या जोडीचे खास फॅन फॉलोविंग आहे. दरम्यान निपूण धर्माधिकारी दिगदर्शित 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकामध्येही अमेय काम करत आहेत. दरम्यान कॉलेज लाईफ पासुन अमेय निपुण यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचे किस्से ऐकण्याची त्यांच्या चाहत्यांमध्येही खास उत्सुकता असते. सोशल मीडियामध्ये दोघेही बरेच अ‍ॅक्टिव्ह असल्याने अधून मधून त्यांच्या आयुष्यातील काही धम्माल गोष्टी दोघेही शेअर करत असतात.

अमेय वाघच्या निपुणसाठी खास शुभेच्छा

निपुण धर्माधिकारी याने यापूर्वी राहुल देशपांडे सोबत अनेक संगीत नाटकं दिग्दर्शित केली आहेत. दरम्यान वेब शोमध्येही त्याची झलक पहायला मिळल्ते. बापजन्म हा निपुणचा मराठी सिनेमा दिगदर्शनातील पहिला प्रयत्न होता. लवकरच ' मी वसंतराव' हा पंडीत वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावरील सिनेमा येणार आहे. पण तत्पूर्वी रसिकांना नेटफ्लिक्सवर 'मिसमॅच' हा शो पहायला मिळेल. काही दिवसांपूर्वीच त्याची घोषणा झाली आहे. यामध्ये लोकप्रिय युट्युबर 'मॉस्टली सेन' म्हणजेच प्राजक्ता कोळी देखील आहे.