AB Aani CD: अमिताभ बच्चन, विक्रम गोखले यांचा 'एबी आणि सीडी' 1 मे रोजी Amazon Prime Video वर होणार प्रदर्शित
AB Aani CD Teaser Out (Photo Credits: YouTube)

हिंदी चित्रपटांमधील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि मराठीसह इतर अनेक भाषांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने छाप पाडणारे विक्रम गोखले (Vikram Gokhale) यंदा प्रथमच एकत्र येत आहे. या दोघांच्या भूमिका असणारा 'एबी आणि सीडी' (AB Aani CD) हा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा चित्रपट Amazon Prime Video वर महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Day) औचित्य साधत, 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या आधी 13 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता, मात्र कोरोना व्हायरसमुळे याला चांगला फटका बसला.

AB Aani CD ट्रेलर -

चित्रपट सृष्टीमधील दोन मातब्बर कलाकार एकत्र येत असल्याने या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपट 13 मार्च रोजी प्रदर्शित झाला मात्र, तेव्हढ्यात कोरोना व्हायरसचे संकट उभा राहिले, त्यामुळे नाईलाजास्तव हा चित्रपट चित्रपटगृहामधून काढण्यात आला. आता महाराष्ट्र दिन, 1 मे रोजी हा चित्रपट Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. याबाबत निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांसाठी हा चित्रपट उपयुक्त ठरेल. सध्याच्या परिस्थितीतमध्ये लोकांची सुरक्षा व रोग्याचा विचार करून हा चित्रपट डिजिटल मंचावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ (हेही वाचा: Hundred Trailer: 'रिंकू राजगुरु'चा हिंदी वेबसिरिज 'हंड्रेड'द्वारे डिजिटल डेब्यू; लारा दत्तासोबत गुप्तहेर बनून उडवली धमाल (Video)

दरम्यान, मिलिंद लेले यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अक्षय बरदापूरकर, अभयानंद सिंह, अरविंद रेड्डी, कृष्णा परसोद आणि पीयूष सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बिग बी आणि विक्रम गोखले यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता अक्षय टंकसाळे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.