Aaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी
आरॉन सिनेमा Photo Credits: File Photo

'आरॉन'(Aaron) हा मराठी सिनेमा आज  7 डिसेंबरला देशभर रिलीज झाला आहे. शशांक केतकर(Shashank Ketkar) , अथर्व पाध्ये(Atharva Padhye), नेहा जोशी(Neha Joshi)  या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. जगभरातील नामांकित फिल्म फेस्टिवस्टमध्ये या सिनेमाचं विशेष कौतुक झालं आहे. त्यानंतर आता हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. जगभरात स्टॅन्डिंग अव्हेशन मिळवणारा हा सिनेमा त्याच्या नावापासून ते सिनेमातील कलाकार आणि सिनेमाशी निगडीत कलाकारांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये हटके आहे. त्याचं वेगळेपण रूपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी अजून काही दिवसांची प्रतिक्षा आहे. पण त्याआधी 'आरॉन'(Aaron) सिनेमाची खास वैशिष्ट्य !

आरॉन' सिनेमा खास का आहे?

‘आरॉन’ (Aaron)  हे एक फ्रेंच नाव आहे त्यामुळे या सिनेमाचं कथानक आणि फ्रान्स यांच एकमेकांशी खास नात आहे.

आरॉन  भारताप्रमाणेच फ्रान्स, रोमेनिया, इस्राएल, कॅनडा, हंगेरी या देशांमध्ये शूट झाला आहे.

‘आरॉन’  सिनेमाचा डीओपी आहे हंगेरी देशाचा, क्रिएटिव्ह प्रोड्युसर इस्राएलचा, तर आर्ट डिरेक्टर रोमेनिया देशाचा आहे. सिनेमामध्ये 80% तंत्रज्ञ फ्रेंच आहेत.

आरॉन   सिनेमाच बहुतांश शुटिंग हे पॅरिसमध्ये झालं आहे. मराठी आणि भारतीय कलाकारांसोबतच या सिनेमात कॅनेडियन, फ्रेंच कलाकारांची पात्रदेखील आहेत. बर्नाबास तोथ व अँटोनिएट फेकेटे हे फ्रेंच कलाकार या सिनेमात काम करणार आहेत.

परदेशात शूटिंग करणं ही अत्यंत आव्हानात्मक बाब असते. आरॉन सिनेमाच्यावेळेस कलाकारांनी -4 डिग्री तापमानातही काम केले आहे. स्थानिकांच्या मदतीने कलाकारांनी अशा परिस्थितीमध्येही काम केले आहे.

प्रामुख्याने परदेशात शूट होणार आरॉन  हा पहिला वहिला मराठी सिनेमा आहे. पॅरिसमध्ये या सिनेमाचे प्रामुख्याने शूटिंग झाले आहे. जवळपास 80% चित्रण फ्रान्समध्ये झाले आहे तर उर्वरित शुटिंग भारतामध्ये झाले आहे.

 आरॉन सिनेमाचा ट्रेलर  

जिएनपी फिल्म्स’प्रस्तुत आरॉन सिनेमाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली आहे. ओमकार रमेश शेट्टी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.