Aaichi Aarti From Hirkani: आशा भोसले यांच्या आवाजातील 'आईची आरती';'हिरकणी' चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित
Aaichi Aarti From Hirkani (Photo Credits: YouTube)

आजवर आपण आईचे महत्व सांगणारी अनेक गाणी, कविता ऐकली. मात्र आता 'हिरकणी' (Hirkani) चित्रपटातून आईचे माहात्म्य सांगणारी 'आईची आरती' (Aaichi Aarti) आपल्या भेटीला येणार आहे. अंगावर काटा आणणारे आणि डोळ्यांच्या कडा टचकन ओले करणारे हे गाणे ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहेत. या गाण्याला सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे स्वरसाज चढवण्याचे शिवधनुष्य पेललय ते संगीतकार अमितराज (Amitraj) यांनी. नुकतेच हे गाणे प्रदर्शित झाले आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 24 ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हिरकणीच्या माध्यमातून 'आईची आरती' हा मराठीतील आगळावेगळा प्रयत्न प्रथमच करण्यात आला आहे. ही आरती संदीप खरे (Sandeep Khare) यांनी लिहिली आहे. आईचा धावा करणारे आणि आईला आर्त घालणारी ही आरती एकदा ऐकाच

आईची आरती:

हेदेखील वाचा- Shivrajyabhishek Geet: हिरकणी चित्रपटातील शिवराज्याभिषेक गीत प्रेक्षकांच्या भेटीला; 9 कलाकार, 6 लोककलांच्या माध्यमातून छ. शिवरायांना मानाचा मुजरा

या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता अमित खेडेकर (Ameet Khedekar) प्रमुख भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे लेखन चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar) यांनी केले असून काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील शिवराज्याभिषेक गीत प्रदर्शित झाले होते. हे गीत नऊ कलाकार आणि सहा लोककलांमधून सादर केले गेले आहे.

इरादा एन्टरटेनमेंट आणि राजेश मापुस्कर निर्मित हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. हिरकणी चित्रपटाचा रोमांचित करणारा हा ट्रेलर पाहून चित्रपटाबाबात प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली असेल असे म्हणायला हरकत नाही.