Well Done Baby चित्रपटातील 'आई-बाबा' गाणे प्रदर्शित, पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर यांच्यावर चित्रित केलेले हे सुंदर गाणे तुम्ही ऐकले का?, Watch Video
Aai-Baba Song in Well Done Baby (Photo Credits: YouTube)

पहिल्यांदाच ऑनस्क्रीन झळकणारी जोडी पुष्कर जोग (Pushkar Jog) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) यांचा चित्रपट 'वेल डन बेबी' (Well Done Baby) लवकरच प्रदर्शित होणार आहे. दोन दिवसांपूर्वी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. माता-पिता बनण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या 'आई-बाबा' (Aai-Baba Song) यांच्यावर हे गाणे आहे. या चित्रपटातील 'आई-बाबा' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. नव्या पाहुण्याची लागलेल्या आणि लवकरच आई-बाबा होणा-या या जोडप्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जाईल असे हे गाणे आहे.

रोहन-रोहन ही मराठी सिने क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावंत जोडी असून त्यांनी वेल डन बेबी’चे संगीत तयार केले आहे. या सुमधुर अल्बमविषयी बोलताना अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला की, "संगीत हा आमच्या वेल डन बेबी फिल्मचा अविभाज्य भाग आहे. नक्कीच गाण्यांमुळे फिल्मची उंची वाढेल, तसेच ही गाणी प्रसंगांना साजेशी आहेत. प्रत्येक गाण्याला खोल अर्थ आहे."हेदेखील वाचा- Well Done Baby Trailer: पुष्कर जोग व अमृता खानविलकर यांच्या 'वेल डन बेबी'चा ट्रेलर प्रदर्शित; खळखळून हसवत भावनिक करणारा प्रवास (Watch Video)  

Watch Video

आई बाबा हे गाणे अतिशय प्रतिभावंत रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच संगीत संयोजन केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. संगीत संयोजनात रोहन गोखले याने देखील आपली भूमिका चोख निभावली असून उर्वरीत गाण्यांना अर्पिता चक्रवर्ती या गायिकेचा स्वरसाज लाभला आहे. हा सिनेमा प्रियांका तन्वर हिने दिग्दर्शित केला असून मर्मबंध गव्हाणे लेखक आहेत. वेल डन बेबी’मध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आनंद पंडित, मोहन नाडर आणि पुष्कर जोग हे सिनेमाचे निर्माते आहेत तर व्हिडीओ पॅलेस सादरकर्ते आहेत. भारतात प्राईम मेंबर्सकरिता 9 एप्रिल 2021 पासून सिनेमा स्ट्रीम होईल.