'सैराट' दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा आर्ची -परशासह ‘मनचिसे’त झिंगाट प्रवेश
छायाचित्र सैजन्य: मनसे ट्विटर

मुंबई: 'सैराट' या सुपर-डुपर चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेत प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, नागराज यांच्यासोबतच 'सैराट' चित्रपटातील आर्ची, परशाच्या प्रमुख भूमिकेत झळकलेल्या रिंकू-राजगुरु यांनीही ‘मनचिसे’ प्रवेश केला आहे.

राजकीय अर्थ काढू नका

दरम्यान, नागराज, आकाश आणि रिंकू यांच्या 'मनचिसे'तील प्रवेशाचे राजकीय अर्थ काढू नका, असे अवाहन मनेसच्या चित्रपट सेनेने केले आहे. आम्ही या क्षेत्रात करत असलेले काम पाहूनच त्यांनी ‘मनचिसे’त प्रवेश केल्याचेही ‘मनचिसे’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चर्चेला उधान

दरम्यान, या तिघाही कलाकारांचा ‘मनचिसे’त प्रवेश व्हावा यासाठी प्रक्रिया सुरू होती. अखेर या तिघांनीही ‘मनचिसे’ प्रवेश केला. मात्र, त्यानंतर इतर चित्रपट सेना आणि त्यातही सत्ताधारी असलेल्या पक्षांच्या चित्रपट सेनेत या तिघांनी प्रवेश का केला नाही अशी चर्चा आता रंगली आहे.