Photos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ
अनिकेत विश्वासराव (Photo credit : Youtube)

Aniket Vishwasrao Sneha Chavan Marriage : सरत्या वर्षाच्या शेवटी चित्रपटसृष्टीमधील विवाहाचा मोसम चांगलाच रंगत आहे. याचसोबत नुकतेच अभिनेत्री क्रांती रेडकरने जुळ्या मुलींना जन्म दिला तर आता सर्वत्र धामधूम चालू आहे ती अंबानी कन्येच्या लग्नाची. याच दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीचा नेता आज विवाहबंधनात अडकत आहे. मराठीमधील चॉकलेट हिरो अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) आज स्नेह चव्हाण (Sneha Chavan)शी  लग्नाची गाठ बांधत आहे. अनिकेत आणि स्नेहाचे लग्न जून महिन्यातच ठरले होते. यानंतर 5 ऑगस्टला पुण्यात अगदी मोजक्याच लोकांच्या सानिध्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला.

 

View this post on Instagram

 

The way you look at me. #day1 #mehndi #astartwithnoend Thank you @wedding_wings_photography for capturing these lovely moments 

A post shared by Sneha Chavan (@mesnehachavan) on

 

View this post on Instagram

 

Sunshine  #day2 #haldi #astartwithnoend @wedding_wings_photography

A post shared by Sneha Chavan (@mesnehachavan) on

स्नेहा चव्हाणने हळदीचे व मेंहदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शनिवारी आणि रविवारी हे दोन्ही समारंभ पार पडले. त्यानंतर आज यांच्या लग्नाचा सोहळा पार पडेल असे सूत्रांकडून समजत आहे. अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण ‘हृदयात वाजे समथिंग समथिंग’ चित्रपटात एकत्र झळकले आहेत. (हेही वाचा : अभिनेत्री क्रांती रेडकरला कन्यारत्न; दोन जुळ्या मुलींचे आगमन)

 

View this post on Instagram

 

3 days to go !  #astartwithnoend

A post shared by Sneha Chavan (@mesnehachavan) on

लग्नाबद्दल स्नेहाने, हे ठरवून झालेले लग्न असल्याचे सांगितले. एका चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर आम्ही एकमेकांचे फक्त मित्र होतो. मात्र दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु झाल्यानंतर जवळच्या आप्तेष्टांनी आमचे लग्न ठरवले. त्यानंतर आम्ही एकमेकांना समजून घेण्यास पुरेसा वेळ दिला. एकमेकांना जाणून घेतले आणि आता आम्ही हा लग्नाचा निर्णय घेतला आहे, असेही ती म्हणाली. आता या दोघांचे लग्न कुठे आणि कशा प्रकारे पार पडेल ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.