हिंदी चित्रपटसृष्टीमधील चालू असलेला लग्नाचा मोसम आता ओसरला आहे. एकीकडे या अभिनेत्रींनी जोडीदारासह संसारगाड्याला सुरुवात केली असता, दुसरीकडे एका मराठी अभिनेत्रीच्या संसारवेलीवर कळी उमलली आहे. ही अभिनेत्री आहे नन ऑदर दॅन क्रांती रेडकर. काही आठवड्यांपूर्वी क्रांत्री रेडकरने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो तिच्या डोहाळेजेवणाचा असल्याची चर्चा रंगली होती. आता मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आई झाली असून तिच्या घरी दोन जुळ्या मुलींचे आगमन झाले आहे.
2017 साली आयपीएस अधिकारी समीर वानखेडेशी क्रांतीने लग्न केले. कुठेही गाजावाजा न करता, गुपचूप अगदी मोजक्या लोकांच्या सानिध्यात हे लग्न झाले. लग्नानंतरही क्रांतीने काम करणे चालूच ठेवले. 3 डिसेंबरला क्रांतीने मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये या जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.
जत्रा’ सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘ऑन ड्युटी 24 तास’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट होय. तिने ‘काकण’ या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.