वेब दुनियेमध्ये दबदबा असलेल्या नेटफ्लिक्स (Netflix) या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर अनेक दर्जेदाज वेब सीरीज रसिकांना पहायला मिळतात. भारतातील नेटफ्लिक्सवरील पहिली वेब सीरीज 'सेक्रेड गेम्स' मधील सारीच पात्र गाजली. पण पोलिस हवालदार काटेकर अनेकांच्या लक्षात राहिला. ही काटेकरची भूमिका साकारणारा जितेंद्र जोशी आता पुन्हा रसिकांच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सवर त्याची ‘बेताल’ही नवी मालिका येणार आहे. नुकताच जितेंद्रने त्याचा एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे.
24 मे पासून 'बेताल' ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रसिकांना पाहता येणार आहे. या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या निखिल महाजन याने सांभाळली आहे. तर निर्मात्याच्या भूमिकेत बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख आहे. शाहरुखच्या ‘रेड चिलीज एन्टरटेन्मेंट’ने बेताल या नेटफ्लिक्स वरील सीरिजची निर्मिती केली आहे.
'बेताल' ची झलक
View this post on Instagram
दरम्यान जितेंद्रने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओ टिझरमध्ये जवानाच्या पोशाखात एक जण उभा आहे. त्याच्या मागे दोघे आहेत. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओ टीझरमधून आता रसिकांच्या मनात 'बेताल' बद्दल उत्सुकता वाढली आहे.