Aamir Khan: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने एक मोठा खुलासा केला आहे. इंडस्ट्रीतील दिग्गज शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खानसोबत (Salman Khan) स्क्रीन शेअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना आमिरने (Aamir Khan) सहा महिन्यांपूर्वी या दोन्ही कलाकारांसोबत एकत्र चित्रपट करण्याबाबत संभाषण केल्यांचे शेअर केले. "योग्य स्क्रिप्ट" ची वाट पाहत आहोत असे आमिरने यावेळी म्हटले. (‘Pushpa 2 – The Rule’ Box Office Collection Day 2: 'पुष्पा 2' चा बॉक्स ऑफिसवर धुरळा! 2 दिवसात 400 कोटींची कमाई; भारतात 250 कोटींचा आकडा पार)
या चर्चेची आठवण करून देताना आमिर म्हणाला, “सहा महिन्यांपूर्वी शाहरुख, सलमान आणि मी एकत्र होतो आणि आम्ही याबद्दल बोललो होतो. खरे तर हा मुद्दा मांडणारा मीच होतो. मी शाहरुख आणि सलमानला सांगितले की जर आपण तिघांनी एकत्र चित्रपट केला नाही तर खूप वाईट होईल.” बॉलिवूडच्या तिन्ही दिग्गजांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. आमिरच्या म्हणण्यानुसार, शाहरुख आणि सलमान दोघांनीही या कल्पनेला सहमती दर्शवली.
आमिर म्हणाला, तिघांनी मिळून एक चित्रपट केला पाहिजे. हे लवकरच होईल अशी आशा आहे. उत्साह स्पष्ट दिसत असला तरी, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी योग्य स्क्रिप्टची गरज आहे. पण त्यासाठी योग्य प्रकारची कथा हवी आहे."
आमिर खान जेनेलिया डिसूझा आणि दर्शील सफारी यांच्यासोबत सितारे जमीन परमध्ये दिसणार आहे. याव्यतिरिक्त, निर्माता लोकेश कनागराज यांच्याशी एका सुपरहिरो चित्रपटासाठी बोलणी सुरू आहे. जी अंतिम झाल्यास 2026 मध्ये चित्रपट रिलीज होऊ शकतो. आमिर सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्यासोबत लाहोर 1947 ची निर्मिती देखील करत आहे. 2008 च्या ब्लॉकबस्टर गजनीच्या सीक्वलसाठी निर्माता अल्लू अरविंद यांच्याशी चर्चा करत आहे.