बॉलिवूड अभिनेता इरफान खान याची प्रकृती खालावली; मुंबई येथील कोकिळा बेन रुग्णालयात उपचार सुरु
Irrfan Khan (Photo Credit: Twitter)

[Poll ID="null" title="undefined"]बॉलिवूड अभिनेता इरफान खानने (Irrfan Khan) मार्च 2018 मध्ये आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे जाहीर केले होते. यानंतर त्याने सर्व कामे थांबवली होती. त्यानंतर इमरान खान उपचारासाठी लंडनला निगून गेला होता. इरफान खानने कॅन्सरवर मात केली असून उपचारानंतर सप्टेंबर 2019 मध्ये लंडनहून भारतात परतला होता. मात्र, आज सकाळी अचानक त्याची प्रकृती खालावली असून त्याला मुंबई (Mumbai) येथील कोकिळा बेन रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) दाखल करण्यात आले आहे. इरफान खानची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर झाला असून त्यावरच उपचार सुरु आहेत. परंतु, त्याच्या या नियमित उपचारांमध्ये लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे अडथळा तयार होत होता. त्याला त्यामुळेच रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. इरफान खानने मार्च 2018 मध्ये आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे जाहीर केले होते. यानंतर त्याने सर्व कामे थांबवली होती. त्यानंतर उपचारासाठी लंडनला निगून गेला होता. 2019 मध्ये परतल्यानंतर इरफानने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. हे देखील वाचा- स्वप्नील जोशी ला उत्तर रामायणमध्ये 'कुश' ची भूमिका कशी मिळाली? त्याच्याकडूनच 'इथे' ऐका सारे किस्से आणि खास गोष्टी (Watch Video)

इरफानला 2 वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले होते. ही धक्कादायक बातमी त्याने स्वतः दिली होती. त्याने ट्विट करत म्हटले होते, आयुष्यात अचानक काही अशा घटना होतात ज्यामुळे आयुष्य तुम्हाला खूप पुढे घेऊन जाते. मागील काही दिवसांपासून माझ्या आयुष्यात असेच काहीसे घडत आहे. न्यूरो एन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार मला झाला आहे. पण आजुबाजुच्या लोकांच्या प्रेमाने आणि शक्तीने मला नवी आशा मिळाली आहे, असे तो म्हणाला होता. दरम्यान, इरफान खानच्या आई सईदा बेगम यांचे नुकतेच निधन झाले होते. त्याला त्यावेळी लॉकडाऊनमुळे आईच्या अंत्यसंस्कारासाठीही जाता आले नसल्याचेही वृत्त होते. त्यावेळी इरफानने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आईचे अंतिम दर्शन घेतले होते.