व्हिडीओ : मंडईमध्ये घामाने निथळत स्वतः भाजी खरेदी करण्याची वेळ आली इलियाना डिक्रूजवर
इलियाना डिक्रूज (Photo credit : Twitter)

इलियाना डिक्रूजने आपल्या घरातील किचनचा ताबा स्वतःकडेच घेतलेला दिसतोय. त्यामुळे आता ही अभिनेत्री स्वतः भाजीमंडईमध्ये जाऊन भाजी खरेदी करत आहे. सोशल मिडियावर एक व्हिडीओ फारच व्हायरल होत आहे ज्यामध्ये इलियाना डिक्रूज स्वतः भाजी खरेदी करताना दिसत आहे.

अशा प्रकारचे दृश्य फार क्वचित दिसते जिथे एखादा सेलिब्रिटी स्वतः मंडईमध्ये जाऊन भाजीची खरेदी करत आहे. मात्र इलियाना बांद्राच्या भाजी मार्केटमध्ये भाजी विकत घेताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये एका हातात पैसे घेऊन भाजीवाल्याशी भाव करताना इलियाना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

#ileanadcruz snapped shopping for veggies in Bandra today #instalove #actor #Mumbai #India @manav.manglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

इलियाना तेलुगु चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. बर्फी चित्रपटामधील भूमिकेमुळे इलियाना बॉलीवूडमध्येही प्रसिद्ध झाली. त्यांनतर ती रुस्तम, मैं तेरा हीरो, फटा पोस्टर निकला हीरो अशा चित्रपटांमध्येही मुख्य भूमिकेत दिसून आली होती.