Emmys Awards 2022: भारतात 'एमी अवॉर्ड्स' सोहळा कधी, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या
Emmys Awards 2022 (PC - File Image)

Emmys Awards 2022: सर्वात लोकप्रिय पुरस्कारांपैकी एक म्हणजे एमी अवॉर्ड्स (Emmys Awards) सोहळा. 74 वा प्राइमटाइम एमी अवॉर्ड्स 2022, 12 सप्टेंबर रोजी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, यूएसए मधील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये आयोजित केला जाईल. येथे दरवर्षीप्रमाणे, स्टार त्यांच्या उपस्थितीने रेड कार्पेटवर शोभा वाढवतील. अनेक बडे स्टार्स आणि त्यांच्या चित्रपटांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. एमी अवॉर्ड्सचा उत्साह परदेशाप्रमाणेचं भारतातही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. तुम्ही 74 व्या एमी अवॉर्ड्स कधी, कुठे आणि कसे पाहू शकता यासंदर्भात जाणून घेऊयात...

एमी अवॉर्ड्सचा आनंद कधी, कुठे आणि कसा घ्याल -

एमी अवॉर्ड्स 12 सप्टेंबर 2022 रोजी यूएस मधील लॉस एंजेलिस थिएटरमध्ये लाइव्ह होतील. परंतु, वेळेतील फरकामुळे, तुम्ही 13 सप्टेंबरच्या सकाळी भारतात एमी अवॉर्ड्स पाहू शकता. भारतीय प्रेक्षकांसाठी एमी अवॉर्ड्स लायन्सगेट प्लेवर प्रसारित केले जातील आणि अमेरिकन दर्शक ते एनबीसी आणि पीकॉकवर पाहू शकतील. एमी अवॉर्ड्स 2022 भारतात लायन्सगेट प्लेवर 13 तारखेला सकाळी 5:30 वाजता प्रसारित होईल. एमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सॅटरडे नाईट लाइव्हचे केनन थॉम्पसन करतील. (हेही वाचा - Sonali Phogat Murder: सोनाली फोगट हत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य)

या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने -

एमी अवॉर्ड्स 2022 च्या नामांकनांबद्दल बोलायचे तर, यावर्षी सर्वात विनोदी ड्रामा सीरिज 'सक्सेशन' ने नामांकनं जिंकली आहेत. या मालिकेला 25 हून अधिक एमी नामांकन मिळाले आहेत. याशिवाय जेसन सुडेकिस स्टारर Apple TV+ ला देखील सुमारे 20 नामांकन मिळाले आहेत. याशिवाय 'स्क्विड गेम' या कोरियन नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकासाठी 13 नामांकने मिळाली आहेत. अभिनेते जेसन बॅटमॅन, ब्रायन कॉक्स, ली जंग जे, बॉब ओडेव्हक्रिक, अॅडम स्कॉट, जेमी स्ट्रॉंग यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. याशिवाय अनेक मोठे चित्रपट आणि मालिकांना एमी अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळाले आहे.