Titanic Actor Leonardo Dicaprio (PC - Facebook)

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia Ukraine War) आज तेरावा दिवस आहे. मात्र, अद्याप या दोन्ही देशांमधील युद्ध थांबलेले नाही. युक्रेनमधील विध्वंसाची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या युद्धामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. युक्रेनच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी पुढे येत आहेत. दरम्यान, टायटॅनिक फेम अभिनेता लिओनार्डो डिकाप्रियो (Titanic Actor Leonardo Dicaprio) युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

लिओनार्डो डिकाप्रियोने युक्रेनला 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर (भारतीय चलनानुसार 76,88,95,000 म्हणजे सुमारे 76 कोटी रुपये) दान केले आहेत. त्यांच्या या उदारतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेत्याने केलेल्या या मदतीमुळे युक्रेनला मोठी मदत होणार आहे. (वाचा - IIFA Awards 2022: अबुधाबीमध्ये होणार 'आयफा 2022' चे आयोजन; सलमान खान करणार कार्यक्रमाचे होस्टिंग)

विशेष बाब म्हणजे लिओनार्डोची आजी युक्रेनमधील ओडेसा येथील होती. म्हणून अभिनेत्याचे युक्रेनशी जवळचे नाते आहे. युद्धादरम्यान एवढी मोठी रक्कम दान करून त्याने युक्रेनशी आपले नाते अधिक घट्ट केले आहे.

लिओनार्डो डिकॅप्रिओने अनेकवेळा सांगितले आहे की, तो अर्धा रशियन आहे. त्याचे आजी आजोबा रशियाचे आहेत. परंतु, काही अहवालांनुसार, अभिनेत्याचे आजी-आजोबा ओडेसा येथील आहेत. काहींच्या मते तो खेरसनचा होता. ओडेसा आणि Kherson हे दोन्ही प्रदेश युक्रेनमधील आहेत.