Aaron Carter Dies: गायक-रॅपर आरोन कार्टरचे 34 व्या वर्षी निधन; कॅलिफोर्नियामध्ये सापडले मृतावस्थेत
Aaron Carter (PC - Instagram)

Aaron Carter Dies: मिळालेल्या माहितीनुसार, पॉप आयकॉन म्हणून ओळखले जाणारे गायक आणि रॅपर आरोन कार्टर (Aaron Carter) यांचे वयाच्या 34 व्या वर्षी शनिवारी 5 नोव्हेंबर रोजी निधन झाले. आरोन कार्टरचा मृतदेह त्याच्याच घरात सापडला. अॅरॉनने 1997 मध्ये वयाच्या नऊव्या वर्षी त्याचा पहिला अल्बम रिलीज केला. अॅरॉन कार्टर बॅकस्ट्रीट बॉईज (Backstreet Boys) सदस्य निक कार्टर यांचा भाऊ होता.

गायक आणि रॅपर आरोन कार्टरच्या कुटुंबीयांनी गायकाच्या मृत्यूची माहिती दिली. गायक आणि रॅपर आरोन कार्टरचा शेवटचा अल्बम 'लव्ह' 2018 मध्ये रिलीज झाला होता. जो लोकांना खूप आवडला होता. सध्या अॅरॉन कार्टरच्या चाहत्यांना त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला असून चाहतेही गायकाच्या निधनाने खूप दु:खी झाले आहेत. (हेही वाचा - Alia-Ranbir Baby Girl: कपूर कुटुंबात आली छोटी परी; आलिया भट्टने दिला गोंडस मुलीला जन्म)

लॉस एंजेलिस काऊंटी शेरिफ विभागाचे डेप्युटी अलेजांड्रा पार्रा यांनी सांगितले की, कॅलिफोर्नियातील लँकेस्टर येथील आरोन कार्टरच्या घरी मृतदेह सापडला आहे. चौकशीअंती सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaron Carter (@aaroncarter)

एरॉन पार्टी (कम अँड गेट इट), कार्टरचा दुसरा अल्बम, 2000 मध्ये रिलीज झाला. ट्रिपल-प्लॅटिनम रेकॉर्ड ज्यामध्ये 'दॅट्स हाऊ आय बीट शाक' आणि 'आय वॉन्ट कँडी' सारख्या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता. कार्टर नंतर डान्सिंग विथ द स्टार्स या शोच्या ९व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसला.