Alia-Ranbir Baby Girl: कपूर कुटुंबात आली छोटी परी; आलिया भट्टने दिला गोंडस मुलीला जन्म

आलियाने मुलीला जन्म दिल्याची माहिती एका विश्वसनीय सूत्राने दिली आहे. आलिया आणि रणबीरने अद्याप पालक बनण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Alia-Ranbir Baby Girl: कपूर कुटुंबात आली छोटी परी; आलिया भट्टने दिला गोंडस मुलीला जन्म
Alia Bhatt and Ranbir Kapoor (Photo Credits: Instagram)

Alia-Ranbir Baby Girl: बॉलिवूडमधील चाहत्यांचे सर्वात लाडके कपल आलिया भट्ट ((Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आई-वडील झाले आहेत. मुंबईतील KHN रिलायन्स रुग्णालयात आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर संपूर्ण कपूर कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. आलियाला मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रणबीर कपूरही रुग्णालयात उपस्थित होता. आलियाने मुलीला जन्म दिल्याची माहिती एका विश्वसनीय सूत्राने दिली आहे. आलिया आणि रणबीरने अद्याप पालक बनण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

खरं तर, जेव्हापासून आलिया आई झाल्याची बातमी समोर आली आहे. तेव्हापासून, कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त, चाहते देखील त्यांच्या बाळाच्या जगात येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आज सकाळी आलियाने रिलायन्स हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. सध्या बाळ आणि आलिया दोघेही निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी बाळाच्या जन्मापूर्वी आलियाने थाटामाटात बेबी शॉवर साजरा केला होता. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये आलिया पिवळ्या रंगाच्या सुंदर सूटमध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिची प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत होता. (हेही वाचा - Priyanka Chopra at Mumbai: तब्बल तीन वर्षानंतर भारतात परतलेल्या देसी गर्लचा आनंद गगनात मावेना, माहेरवाशीन प्रियंका चोप्राचा मुंबईत फेरफटका)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याचवर्षी १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले. दोघांचे लग्न अगदी साधेपणाने त्यांच्या घरी झाले. ज्यामध्ये आलिया नो मेकअप लूकमध्ये दिसली होती. दोघांच्या या लग्नाला चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळाले.

(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2022 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).