Sexiest International Man Alive 2020: BTS सदस्य Jungkook बनले जगातील सर्वात सेक्सिएस्ट पुरुष! पीपल्स मॅगझीनच्या घोषणेनंतर समोर आले हे Hot Photos
जंगकूक (Photo Credits: Instagram)

Sexiest International Man Alive 2020: पीपल्स मासिकाने के-पॉप स्टार बीटीएस सदस्य जंगकूक (Jungkook) ची निवड जगातील सर्वात सेक्सिएस्ट व्यक्ती (Sexiest Man) म्हणून केली आहे. डॅन लेवी, किथ अर्बन, मॅथ्यू र्हिस आणि पॉल मेस्कल यासारख्या नामांकित व्यक्तींना मागे टाकत जंगकूकने या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. जंगकूकबद्दल या मोठ्या घोषणेनंतर ट्विटरवर #SexiestManJungkook हॅशटॅग व्हायरल होऊ लागला आहे. तसेच लोकांनी त्याचा विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जंगकूकचे खरे नाव जियोन जंग-कुक असे असून तो एक गायक आणि गीतकार आहे. 2013 मध्ये त्यांनी बीटीएसबरोबर काम करण्यास सुरुवात केली होती.

आता जगातील सर्वात सेक्सी माणूस म्हणून निवड झाल्यानंतर बीटीएस आर्मीने ट्विटरवर त्यांचे अनेक फोटो शेअर केले. यात जंगकूकचा हॉट आणि स्टायलिश स्टाईलिश अंदाज पाहायला मिळाला. (हेही वाचा - Bharti Singh पाठोपाठ पती Haarsh Limbachiyaa ला देखील NCB कडून अटक; दोघांनीही दिली गांजा ओढल्याची कबुली)

जंगकूक हॉट फोटोज - 

अलीकडेच बीटीएसने त्यांचा 'बीई' (BE) नवीन अल्बम प्रसिद्ध केला. त्याचा अल्बम सर्वात वेगात विकला जाणारा आणि ऐकलेला संगीत अल्बम बनला. तसेच त्याचे 'लाइफ गोज ऑन' हे गाणे यूएस आय-ट्यूनवर प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या एका तासात अव्वल चार्टवर पोहोचले.