Nick Jonas And Priyanka Chopra Jonas (Photo Credits: You tube)

अमेरिकन पॉपस्टार जोनस ब्रदर्स (Jonas Brother) यांचं गाणं 'Sucker' आज रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये जोनस ब्रदर्ससोबतच प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि सोफी टर्नरदेखील (Sophie Turner) झळकल्या आहेत. त्याची एक खास क्लिप सध्या सोशल मीडियामध्ये शेअर करण्यात आली आहे. जोनस ब्रदर्सच्या या गाण्यामध्ये देसी गर्ल प्रियंका चोप्राचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजही सार्‍यांच्या नजरा वेधून घेत आहे.

सकर गाण्यामध्ये प्रियंका आणि निक जोनस इंटिमेट होताना दिसले आहेत. निकने एक खास ट्विट करून प्रियंका चोप्राचं कौतुक केलं आहे. 'व्हिडिओमध्ये प्रियंका किती सुंदर दिसतेय, मी फार लकी आहे असं म्हटलं आहे.

निक जोनसचं खास ट्विट 

प्रियंका चोप्रा बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही सिनेमांमध्ये काम करत आहे. लवकरच प्रियंका बॉलिवूडच्या ' द स्काय इज पिंक' या सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमामध्ये प्रियंकासोबत फरहान अख्तर, जायरा वसिम हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. शोनाली बोस या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.