No Time To Die Trailer 2.0: जेम्स बॉण्ड चे जबरदस्त अॅक्शन सीन्स असलेल्या 'नो टाइम टू डाय' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; Watch Video
No Time To Die Trailer 2.0 (PC - You Tube)

No Time To Die Trailer 2.0: जेम्स बॉण्ड (James Bond) चे जबरदस्त अॅक्शन सीन असलेल्या 'नो टाइम टू डाय' (No Time To Die) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट जेम्स बॉन्ड फ्रांयजचीतील 25 वा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यातील धमाकेदार अॅक्शन सीनमुळे नेटीझन्सचे डोळे दीपले आहेत.

'नो टाइम टू डाय' चित्रपटात अंगावर शहारे आणणारे स्टंट दाखवण्यात आले आहेत. प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात जेम्स बॉण्डच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या चित्रपटात जेम्स बॉण्डची भूमिका डॅनियल क्रेगने (Daniel Craig's) साकारली आहे. (हेही वाचा - Dwayne Johnson Recovered from Coronavirus: हॉलीवुड अभिनेता ड्वेन जॉन्सन व कुटुंबाला 2 आठवड्यांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण; सध्या सर्वजण बरे झाल्याची माहिती (Watch Video))

प्राप्त माहितीनुसार, 'नो टाइम टू डाय' चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना संकटामुळे तो नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी डॅनिअल क्रेगने चार वेळा जेम्स बॉन्डची भूमिका साकारली आहे. त्यामुळे 'नो टाइम टू डाय' या चित्रपटात पाचव्यांदा डॅनिअल क्रेगचा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.