
Michael Jackson Biopic 2026 Release: मायकल जॅक्सन (Michael Jackson Biopic) यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित बायोपिक ‘Michael’ आता 2026 मध्ये प्रदर्शित (Michael Jackson Movie Release Date) होण्याची शक्यता आहे. लायन्सगेटचे सीईओ जॉन फेलथाइमर यांनी कंपनीच्या Q4 2025 च्या अर्निंग कॉलदरम्यान ही माहिती दिली. फेलथाइमर म्हणाले की, दिग्दर्शक अँटोनी फुक्वा आणि निर्माता ग्राम किंग यांनी सादर केलेले 3.5 तासांचे शानदार फुटेज मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की हा चित्रपट फिस्कल इयर 2026 च्या बाहेर म्हणजेच एप्रिल 1, 2026 नंतर प्रदर्शित केला जाईल. अँटोइन फुक्वा दिग्दर्शित आणि ग्रॅहम किंग निर्मित हा चित्रपट मूळतः 3 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार होता.
बायोपिक दोन भागांमध्ये रिलीज होण्याची शक्यता
फेलथाइमर यांनी सांगितले की, आमच्याकडे मायकेल जॅक्सन यांचे अद्भुत वाटावे असे 3 ½ तासांचे फुटेज आहे. लवकरच चित्रपटाच्या निश्चित रिलीज टाइमिंगची घोषणा केली जाईल, असे फेलथाइमर यांनी स्पष्ट केले. Variety च्या अहवालानुसार, हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य छायाचित्रण मे 2024 मध्ये पूर्ण झाले असले तरी जॉन लोगन यांनी लिहिलेला स्क्रिप्ट सध्या पुन्हा लिहिला जात आहे, आणि काही रीशूट्स होणार आहेत. (हेही वाचा, Quincy Jones Passes Away: संगीत निर्माते क्विन्सी जोन्स यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन)
जाफर जॅक्सन पॉपचा राजा म्हणून करणार पदार्पण
या चित्रपटात दिवंगत पॉप आयकॉनचा पुतण्या जाफर जॅक्सन मायकेल जॅक्सनच्या भूमिकेत पडद्यावर पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत मायकेलच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील प्रमुख व्यक्तींची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा समूह आहे. कोलमन डोमिंगो आणि निया लॉंग मायकेलचे पालक, जो आणि कॅथरीन जॅक्सन यांची भूमिका साकारत आहेत. माइल्स टेलर जॅक्सनचे दीर्घकाळचे वकील आणि सल्लागार जॉन ब्रांका यांची भूमिका साकारत आहेत. लॅरेंझ टेट मोटाऊन रेकॉर्ड्सच्या संस्थापक बेरी गॉर्डीची भूमिका साकारतील. लॉरा हॅरियर अग्रणी संगीत कार्यकारी सुझान डी पासेची भूमिका साकारत आहेत आणि कॅट ग्राहम दिग्गज गायिका डायना रॉसच्या भूमिकेत दिसतील. (हेही वाचा, James Earl Jones Passes Away: ज्येष्ठ अभिनेते जेम्स अर्ल जोन्स यांचे वयाच्या 93 वर्षी निधन, न्युयॉर्क येथील राहत्या घरात घेतला अखेरचा श्वास)
इतर कलाकार कोण?
क्विन्सी जोन्स आणि मायकेल जॅक्सन यांनी तीन प्रतिष्ठित अल्बममध्ये सहकार्य केले: ऑफ द वॉल (1979), थ्रिलर (1982) आणि बॅड (1987) - या प्रत्येकाने आधुनिक पॉप संगीताला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सिनेमाकॉन 2025 मध्ये कोणतेही फुटेज दाखवले गेले नाही. लायन्सगेटच्या 2024 च्या सिनेमाकॉन प्रेझेंटेशनमध्ये मायकेल हा एक प्रमुख आकर्षण होता, परंतु या वर्षीच्या कार्यक्रमादरम्यान कोणतेही फुटेज दाखवण्यात आले नाही, ज्यामुळे रिलीज पुढे ढकलण्यात आल्याचे दिसून येते.
चाहते निश्चित रिलीज धोरणाची वाट पाहत असताना, लायन्सगेटने पुष्टी केली की विलंब स्टुडिओच्या आर्थिक वर्ष 2026 च्या कमाईवर परिणाम करेल परंतु आर्थिक वर्ष 2027 साठी स्लेट मजबूत होण्याची अपेक्षा आहे. स्टुडिओ येत्या आठवड्यात अचूक रिलीज तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.