जगभरात कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. कोरोना विषाणुची लागण झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या जाळ्यातून अनेक दिग्गज व्यक्तींही सुटू शकलेले नाहीत. अशातच आता 'जेम्स बाँड' फेम (James Bond) अभिनेत्री ओल्गा कुरिलेंको (Olga Kurylenko) हिला कोरोनाची लागण झाली आहे. कुरिलेंको यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली आहे.
ओल्गा कुरिलेंकोने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बाँड सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 40 वर्षांची ओल्गा सध्या कोरोनासोबत झुंज देत आहे. ओल्गा गेल्या आठवडाभरापासून आजारी होती. त्यानंतर तिची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. (हेही वाचा - Coronavirus मुळे घरात राहिलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण ने केले एका उत्तम गृहिणीला शोभेल असे काम)
ओल्गा कुरिलेंको हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या असून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळली होती. ताप आणि सर्दीमुळे मला त्रास होत होता. चाचणी केल्यानंतर कोरोना झाल्याचं निदान करण्यात आलं आहे. आता प्रत्येकांनी ही बाब गांभीर्यानं घेऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतील पाहिजे.'
मागील आठवड्यात सुप्रसिद्ध आणि ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तसेच गेल्या आठवड्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची पत्नी सोफी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.