हॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता हार्वे वीनस्टीन (Harvey Weinstein) याच्या विरुद्ध अभिनेत्री डॉन डनिंग (Dawn Dunning) हिने लावलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे मनोरंजन विश्वात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हार्वेने तिला तीन मोठ्या सिनेमाची ऑफर देताना चक्क आपल्यासोबत थ्रीसम (Threesome) करण्यास सांगितले होते असा तिचा आरोप आहे. डॉन डनिंग म्हणाल्या की, हार्वे वीनस्टीनने तो आणि त्याचा सहाय्यका सोबत थ्रीसम करण्याच्या मोबादल्यात तीन सिनेमांमध्ये काम देण्याची ऑफर दिली होती. एवढंच नाही तर हा प्रस्ताव देतानाही वीनस्टीनने आक्षेपार्ह पद्धतीने तिच्यावर हात ठेवला होता. यावर सुरुवातीला डनिंग यांना वीनस्टीन मस्करी करत असल्याचं वाटलं. मात्र प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी वीनस्टीन ला कठोर शब्दात सुनावले ज्यावर वीनस्टीनने तू हॉलिवूडमध्ये कधीही यशस्वी अभिनेत्री होऊ शकत नाहीत असं उत्तर दिलं .
आजवर वीनस्टीनवर हॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींसह 100हून जास्त महिलांचे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहेत . हार्वे वीनस्टीन हा हॉलिवूडमधील नावाजलेला निर्माता आहे. त्याच्या प्रोडक्शनमध्ये तयार करण्यात आलेल्या 81 सिनेमांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
Watch Video: 'कपडे काढ आणि न्यूड वॉक करून दाखव' शर्लिन चोप्राने शेअर केला धक्कादायक अनुभव
दरम्यान, कास्टिंग काऊचच्या नावाखाली अनेक अभिनेत्रींना आजवर फिल्मी दुनियेत लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला आहे, मागील वर्षी या सर्व अत्याचारणाच्या विरोधात #metoo अशी मोहीम सुरु झाली होती, ज्यात जगभरातील अनेक मोठी नावे समोर आली होती. बॉलिवूड मध्ये तनुश्री दत्त हिने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाने या मोहिमेला सुरुवात झाली होती.