'गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 2024' (Golden Globe Awards 2024 ) चं यंदाचं 81 वं वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक हॉलिवूड चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'ओपनहाइमर' (Oppenheimer) आणि 'बार्बी' (Barbie) चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी या चित्रपटांनी मोठी कमाई देखील केली आहे. क्रिस्टोफर नोलनला ओपनहायमर साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार मिळाला तर सिलियन मर्फीला ओपनहाइमरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

पाहा पोस्ट -

पाहा विजत्यांची यादी -

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- क्रिस्टोफर नोलन ओपनहायमर
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- एलिझाबेथ डेबिकी द क्राउन
  • मोशन पिक्चर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रॉबर्ट डाउनी जूनियर, ओपेनहायमर
  • मोशन पिक्चर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- द'वाइन जॉय रँडॉल्फ 'द होल्डओव्हर्स'
  • बेस्ट परफॉर्मेंस, स्टँड-अप कॉमेडी- रिकी गेर्वाईस
  • बेस्ट पिक्चर, नॉन इंग्लिश लँग्वेज- एनाटॉमी ऑफ द फॉल
  • मोशन पिक्चर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- एम्मा स्टोन, पुअर थिंग्ज
  • सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट अवॉर्ड - बार्बी
  • ओरिजनल स्कोअर, मोशन पिक्चर अवॉर्ड- लुडविग गोरानसन, ओपनहायमर
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता- सिलियन मर्फी, ओपनहाइमर
  • टेलिव्हिजन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- मॅथ्यू मॅकफॅडियन, सक्सेशन