Ghana: अभिनेत्री Rosemond Brown ने स्वतःच्या मुलासोबत क्लिक केला Nude Photo; कोर्टाने सुनावली 90 दिवस तुरुंगवासाची शिक्षा
Rosemond Brown (Photo Credit Instagram)

घानाची (Ghana) अभिनेत्री रोजमोंड ब्राउन (Rosemond Brown) नेहमीच आपल्या सोशल मिडिया फोटोंमुळे चर्चेत असते. आता रोजमोंडला आपल्या मुलाच्या वाढदिवशी नग्न फोटो (Nude Photo) काढणे महागात पडले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या गुन्ह्यासाठी कोर्टाने समाजात अश्लीलता आणि घरगुती हिंसाचार पसरल्याबद्दल रोजमोंड ब्राउनला दोषी ठरवले आहे आणि तिला तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. आता घाना राजधानी आक्राच्या कोर्टाने सिंगन मदर असलेल्या रोझमोंड ब्राउनला जामीन मंजूर केला आहे. त्या नग्न फोटोबाबत देशभर रोझमोंड ब्राउनविरूद्ध प्रचंड मोहीम राबविण्यात आली होती.

जून 2020 मध्ये रोजमोंड ब्राउनने तिच्या मुलाच्या सातव्या वाढदिवशी त्याचा हात धरलेला एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ती पूर्णतः नग्न होती व तिचा मुलगा फक्त अंडरवेअरवर होता. आपल्या केसांनी तिने आपले शरीर झाकले होते. या फोटोनंतर घानामध्ये गदारोळ माजला होता. लोकांनी अभिनेत्री आणि तिच्या मुलाच्या फोटोवर बरेच प्रश्न उपस्थित करण्यास सुरवात केली, त्यानंतर रोजमोंड ब्राउनला हा फोटो सोशल मीडियावरून हटवावा लागला आणि माफीनामाही प्रसिद्ध करावा लागला. (हेही वाचा: Naked Protest: फ्रेंच अभिनेत्री Corinne Masiero हिने अचानक स्टेजवर उतरवले कपडे, Nude होत सरकारसाठी पाठीवर लिहिला 'हा' संदेश)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rosemond Alade Brown (@akuapem_poloo)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rosemond Alade Brown (@akuapem_poloo)

त्यानंतर कोर्टाने सिंगल मदर असल्याने रोजमोंडला याबाबत 90 दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सुनावणीच्या वेळी न्यायाधीश क्रिस्टिना काईन यांनी अश्लील कंटेंट पोस्ट करणे व घानामधील बाल अत्याचारात होणाऱ्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली. मात्र कोर्टाच्या या निर्णयाची जगभरात निंदा झाली. कार्डी बीने ट्वीट करुन अभिनेत्रीला पाठिंबा दर्शविला होता. तिने म्हटले होते की, ‘मी बऱ्याच अमेरिकन लोकांना असे फोटोशूट करताना पाहिले आहेत. ही माझी स्टाईल नाही, परंतु मला वाटते की हे फोटोशूट सेक्शुअल नाही तर एक नैसर्गिक कल्पना म्हणून क्लिक केले होते. मला वाटते की यासाठी तुरुंगवास मोठी शिक्षा आहे.’