captain-marvel (Photo Credits: Instagram)

हॉलिवूडचा 'कॅप्टन मार्वल' (Captain Marvel) हा बहुप्रतिक्षित सिनेमा आज जगभरात रीलिज करण्यात आला आहे. मात्र पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाईन माध्यमात लीक झाला आहे. बॉलिवूड आणि मराठी तसेच प्रादेशिक सिनेमांसोबतच हॉलिवूडचे सिनेमेदेखील पायरसीच्या जाळ्यात अडकले आहेत. सध्या 'तमिळ रॉकर्स' (TamilRockers) ऑनलाईन साईटवर 'कॅप्टन मार्वल' लीक झाला आहे. यासोबतच इतर काही पायरसी वेबसाईट्सवरही 'कॅप्टन मार्वल' पहायला मिळत आहे.

केवळ हॉलिवूडच नव्हे जगभरातील अनेक दर्शकांना या सिनेमाबद्दल कमालीची उत्सुकता होती. दमदार ट्रेलरनंतर अनेकांची उत्कंठा वाढली होती. भारतामध्ये इंग्रजीसोबत इतर अन्य भाषांमध्येही हा सिनेमा रीलिज करण्यात आला आहे. यामुळे अधिकाधिक प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी सिनेमा अनेक भारतीय भाषांमध्येही रीलिज करण्यात आला आहे. मात्र आज सिनेमा रीलीज होताच काही वेळात तो लीक देखील झाला आहे.

सरकरने तमिळ रॉकर्ससह अनेक पायरसी लिंक शेअर करणार्‍या वेबसाईट्सना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यानंतरही सिनेमे सर्रास अल्पावधीतच ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होत आहेत. 'कॅप्टन मार्वल' सिनेमाचं दिगदर्शन एना बोडेन (Anna Boden) यांनी केलं आहे. तर ब्री लार्सन (Brie Larson), सैमुअल एल जैक्सन (Samuel L. Jackson), बेन मेंडेलसोहन (Ben Mendelsohn), जाइमन ऊनसू, ली पेस, मैकेना ग्रेस आणि रूने टेम्प हे कलाकार या सिनेमामध्ये झळकले आहेत.