'द नन' सिनेमाने भारतात केली जबरदस्त कमाई !
द नन (Photo Credits: screengrab/ YouTube)

हॉलिवूड सिनेमांना आता भारतातही चांगला प्रेक्षकवर्ग लाभत आहे. याचं दमदार उदाहरण म्हणजे सध्या लोकप्रिय ठरत असलेला 'द नन' हा सिनेमा. बॉलिवूडमध्ये हॉरर सिनेमांची चलती नसल्याने प्रेक्षक हॉलिवूडकडे वळले असावेत.

३ दिवसात केली इतकी कमाई

जगभरातील समीक्षकांनी 'द नन' या सिनेमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या असल्या तरी भारतात हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. गेल्या ३ दिवसात या सिनेमानं ३० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

अशी आहे सिनेमाची कथा

सेंट कार्टा स्थित ऐबीमधील एका घटनेवर 'द नन' या सिनेमाची कथा बेतलेली आहे. या एबीत नन राहत असतात. पण तिथे एक अप्रिय घटना घटते आणि मग या एबीच्या रहस्याचा उलघडा सिनेमात होतो.

इतकी कमाई करण्याची शक्यता

काँज्युरिंग सिरिजमधल्या आधीच्या दोन सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे 'द नन' कडेही प्रेक्षकवर्ग आकर्षित होत आहे. हा सिनेमा भारतात ५० कोटींहुन अधिक कमाई करेल, असे म्हटलं जात आहे.