Mike Nussbaum Passes Away: हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी, ज्येष्ठ अभिनेते माईक नुसबॉम यांचे निधन; 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mike Nussbaum (PC - Instagram)

Mike Nussbaum Passes Away: हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'फील्ड ऑफ ड्रीम्स' (Field of Dreams) आणि 'मेन इन ब्लॅक' (Men in Black) सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केलेले ज्येष्ठ रंगमंच अभिनेते माईक नुसबॉम (Mike Nussbaum) यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे. सुपरहिट चित्रपट 'मेन इन ब्लॅक' फेम माईक नुसबॉमचे जगभरात जबरदस्त चाहते आहेत. माईक नुसबॉम यांच्या निधनाची बातमी ऐकून केवळ चित्रपटसृष्टीलाच नाही तर त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

माईक नुसबॉम यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेता माईक नुसबॉम 100 वर्षे पूर्ण होण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी होता. माईक नुसबॉमची मुलगी, कॅरेन नुसबॉम हिने असोसिएटेड प्रेसला यासंदर्भात माहिती दिली. (हेही वाचा - Comedian Bonda Mani Passes Away: तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध कॉमेडियन बोंडा मणी यांचे किडनीशी संबंधित आजाराने निधन)

माईक नुसबॉम यांना श्रद्धांजली -

माईक नुसबॉम यांना अॅक्टर्स इक्विटी असोसिएशन युनियन (AEA) द्वारे देशातील सर्वात जुने व्यावसायिक अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. माईक नुसबॉमने 2019 मध्ये WBEZ शिकागोला सांगितले होते की, 'मी प्रतिभावान आणि भाग्यवान आहे की मी अजूनही माझ्या आयुष्यातील सर्वात मजेदार गोष्ट करू शकलो आहे आणि जोपर्यंत मी हे करू शकतो तोपर्यंत मी ते करणार आहे.' (हेही वाचा -Artist Imroz Passes Away: प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन; 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

माइक नुसबॉमचा जन्म 29 डिसेंबर 1923 रोजी झाला. या अभिनेत्याने 'फील्ड ऑफ ड्रीम्स' (1989), 'फेटल अॅट्रॅक्शन' (1987), 'मेन इन ब्लॅक' (1997), 'फ्रेझियर' (1993-2004) आणि 'एलए लॉ' (1986-1994) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या कार्यातून त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. नुसबॉमला लीग ऑफ शिकागो थिएटर्सकडून जीवनगौरव पुरस्कार आणि ग्लेनगरी ग्लेन रॉसमधील भूमिकेसाठी न्यूयॉर्क ड्रामा डेस्क पुरस्कार देखील मिळाला.