Happy Birthday Bhumi Pednekar:  'सांड की आंख' ते 'बधाई दो ', वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्रीचे 5 उत्कृष्ट चित्रपट, भूमी पेडणेकरचा अभिनय पाहून व्हाल हैराण
Bhumi Pednekar (Photo Credit - Instagram)

Happy Birthday Bhumi Pednekar: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा आज ३३ वा वाढदिवस आहे. भूमी पेडणेकर आज बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. भूमी पेडणेकरचे 5 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत. भूमी तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिने अक्षय कुमारपासून आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव ते कार्तिक आर्यनपर्यंत उत्कृष्ट  अभिनेत्यांसोबत काम केले आहे. प्रत्येक वेळी तिने तिच्या  दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या दमदार अभिनयामुळे तिला झी सिने पुरस्कार, स्टारडस्ट पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार, आय.आय.एफ.ए. पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भूमीने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा ह्या चित्रपटामध्ये दमदार भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

वाढदिवसानिमित्त पाहूया भूमीचे काही उत्कृष्ट चित्रपट:-

दम लगा के हईशा

भूमी पेडणेकरने 'दम लगा के हईशा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शरत कटारिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अभिनेत्रीने एका छोट्या शहरातील महिलेची भूमिका साकारली होती. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

टॉयलेट- एक प्रेम कथा

'टॉयलेट - एक प्रेम कथा' या चित्रपटात भूमी पेडणेकरने सुपरस्टार अक्षय कुमारसोबत काम केले होते. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट हिट ठरला होता.

शुभ मंगल सावधन 

'शुभ मंगल सावधान' मध्ये पुन्हा एकदा भूमी पेडणेकर आयुष्मान खुरानासोबत दिसली आणि या चित्रपटात तिने उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

सांड की आंख

या चित्रपटात भूमीने शार्पशूटर चंद्रो तोमरची भूमिका साकारली होती. 25 ऑक्टोबर 2019 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटात तिच्यासोबत तापसी पन्नू देखील मुख्य भूमिकेत दिसली होती.

बधाई दो

या चित्रपटात समलिंगीवर आधारित आहे.  या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले.

लवकरच भूमी पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत आनंदल एल राय यांच्या 'रक्षा बंधन' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.