
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ईशाने तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अलीकडेच ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सिझलिंग गाऊनमध्ये दिसत आहे. या गाऊनमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत आहे. हा गुलाबी गाउन डीप नेक असुन ईशाने हा लूक हलका मेकअप आणि खुल्या केसांनी पूर्ण केला आहे. तिने चांदीचे कानातले आणि चांदीचा हारही घातला आहे.