(व्हिडीओ) जेव्हा इटलीच्या रस्त्यावर डिंपल कपाडियांची पावले थिरकू लागतात
डिंपल कपाडिया (Photo Credits: Facebook Fan Page)

इटलीमधील एका छोट्याशा रस्त्यावर एक वादक बॉबी चित्रपटामधील गाण्याची धून आळवीत असतो. योगायोगाने त्याच रस्त्यावरून पावले पडत असतात डिंपल कपाडिया यांची. आठवणी जाग्या होतात, ओठावर हास्याची लकेर उमटते आणि नकळत पावले थिरकायला लागतात. सातासमुद्रापार आपल्या गाजलेल्या चित्रपटामधील गाण्याची धून ऐकून डिंपल कपाडिया यांना काय वाटले असेल याची तुम्ही फक्त कल्पनाच करू शकता.

तर अक्षय कुमार आपल्या कुटुंबासह इटलीमध्ये सुट्टी व्यतीत करीत आहे. फिरता फिरता अचानक या बॉबी चित्रपटामधील गाणे कानावर पडताच डिंपल कपाडिया सर्व काही विसरून त्यावर नाचू लागतात. हा प्रसंग अक्षय कुमारने कॅमेरामध्ये कैद करून सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

बॉबी हा डिंपल कपाडिया यांचा सर्वात लोकप्रिय ठरलेला चित्रपट. साहजिकच या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी असतील. आजही या चित्रपटाचे चाहते पाहायला मिळतात. तिथे परदेशातील एका म्युझिशियनने ही धून वाजवल्यानंतर डिंपल कपाडिया स्वतःला रोखू शकल्याच नाहीत. हे गाणे ऐकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.