अभिमानास्पद! हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'
Most Gorgeous Women in the World (संग्रहित संपादित प्रतिमा)

Most Gorgeous Women in the World: आजकाल फक्त दोनच अभिनेत्रींची बॉलिवूडवर चलती असल्याचे दिसत आहे. एक म्हणजे प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि दुसरी दीपिका पदुकोन (Deepika Padukone). एका सीरीजमुळे प्रियंकाचे करियर रातोरात पालटले, मात्र आजही सुंदरतेच्या बाबतीत दीपिकाच प्रियंकाला मात देते. अभिनय, सुंदर चेहरा, हटके स्टाईल यांच्या जोरावर आज दीपिकाने इतक्या कमी वर्षांत जो पल्ला गाठला आहे तो कौतुकास्पद आहे. आता दीपिकाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. दीपिका ही जगातील सर्वात सुंदर महिला (Most Gorgeous Women) ठरली आहे.

 

View this post on Instagram

 

Taaaaddaaaaa!!! #Cannes2019 @lorealmakeup @lorealhair @lorealskin

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

View this post on Instagram

 

#fanart #FanFriday

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

Observer Dawn या लोकप्रिय मासिकाने दीपिकाला हा बहुमान दिला आहे. हॉलिवूडच्या तमाम तारकांना मागे टाकत दीपिकाचा झालेला हा गौरव भारतासाठी अभिमानास्पद आहे. या यादीत दीपिकासोबत स्कारलेट जोहानसन, अँजेलीना जोली, ब्लेक लाइव्हली, हेल बेरी, बियोन्से, एम्मा वॉटसन या अप्सरांचा समावेश आहे. याबाबत मासिकाने लिहिले आहे, ‘जगातील सुंदर महिलांनी आपले कार्य आणि इतर गुणांद्वारे जादुई इतिहासाची निर्मिती केली आहे.’

दरम्यान, बाजीराव मस्तानी, पिकू, पद्मावत अशा अनेक चित्रपटांमधून दीपिकाने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. xXx: Return of Xander Cage या चित्रपटाद्वारे दिने 2017 साली हॉलिवूड मध्ये पाय ठेवला. जगभरातील तमाम शोजमध्ये दीपिकाने हजेरी लावली आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये तिचा जलवा पाहून अनेक लोक घायाळ झाले आहेत. अशात आता ती जगातील सर्वात सुंदर महिला बनली आहे, हा तिच्यासाठी फार मोठा सन्मान असणार आहे.