डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद ने 'ए भावा माझा जयभिम घ्यावा' गाण्यावर केले खास नृत्य, Watch Video
Deepali Sayyad Dance Video (Photo Credits: Instagram)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती. तमाम भीम प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असून या दिवसाची प्रत्येक भीमप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतो. यंदा कोरोनाचे सावट असल्याने अनेकजण घरात राहूनच डॉ. आंबेडकरांनी आपापल्या परीने अनोखी मानवंदना देत आहे. अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Saiyyad) हिने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या नृत्याविष्काराने डॉ. आंबेडकरांनी मानवंदना दिली आहे. मराठीतील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या 'ए भावा माझा जयभिम घ्यावा' या गाण्यावर ती नाच करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद हिच्यासोबत तिचे डान्स पार्टनर आहेत. आदर्श शिंदे यांचे भीम प्रेमींसाठी असलेले 'ए भावा माझा जयभिम घ्यावा' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन साजरा करा भीम जयंतीचा उत्सव!

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमतात. तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी साधेपणाने सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 8.00 वाजण्यापूर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित आहे. त्यानुसार, भीमप्रमी देखील कोरोना नियमांचे पालन करुन हा सण साजरा करत आहे.

दरम्यान कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कदारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, असे आवाहन केले आहे.