Darbar First Look: सुपरस्टार रजनीकांत ह्याच्या 'दरबार' चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लूक प्रदर्शित
Darbar First Look Poster (Photo Credits-Twitter)

Darbar First Look: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आता लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'दरबार' (Darbar) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लूक आज प्रदर्शित करण्यात आला असून चाहत्यांच्या खुप पसंदीस पडत आहे. या चित्रपटामधून रजनीकांत पोलिसाची आणि सामाजिक कार्यकर्त्याची भुमिका साकारणार आहे. पोस्टरवर रजनिकांत ह्याचा सुपरकुल अंदाज दिसून येत आहे.

दरबार या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादास यांनी केले असून संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर ह्यांनी केले आहे. तर 2020 रोजी पोंगल सणादिवशी प्रदर्शित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. रजनीकांत ह्याचा प्रत्येक चित्रपटातील अंदाज नेहमीच खास असतो तर दरबार चित्रपटात रजनीकांत आयपीएस ऑफिसरची भुमिका साकारणार आहे.

चित्रपटासंबंधित अधिक खुलासा करण्यात आलेला नसून मुंबई संबंधित कथा असल्याची शक्यता आहे. तर रजनीकांत ह्याचा दरबार चित्रपट हा त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर असणार असून आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.