भोजपूरी सिनेस्टार अभिनेता रवी किशन(Ravi Kishan) याला मुंबईत जुहू(Juhu) येथे फ्लॅट देतो असे सांगत काही दलालांनी त्याला दीड कोटींचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रवी किशन याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे.
जुहू येथे अनेक दिग्गज कलाकारांची घरे येथे आहेत. त्यामुळे भोजपूरी कलाकार(Bhojpuri Actor)रवी किशनला सुद्धा येथे घर घ्यायचे होते. या प्रकरणी काही दलालांनी त्याला फ्लॅट देतो अशी सारखी बतावणी करत होते. मात्र या दलालांनी फसवणूक करुन दीड कोटींचा गंडा घातला आहे. रवी किशन यांनी जुहू हाय राईझ सोसायटीत फ्लॅट मिळविण्यासाठी कमला लॅण्ड मार्क ग्रुपचे जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांना फ्लॅटसाठी सांगितले होते.
कमला लॅण्ड मार्क ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित रिअर इस्टेट कंपन्यांनी याअगोदर वर्सोवातील एक व्यावसायिक सुनील नायर यांची देखील साडे सहा कोटींची फसवणूक केली आहे. तर या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.