इन्टरनेटवर सध्या कोणत्या गोष्टी व्हायरल होतील याचा काही नेम नाही. यामध्ये वेगवेगळ्या चॅलेंजेसचाही समावेश आहे. सध्या असेच एक ‘बॉटल कॅप चॅलेंज’ (Bottle Cap Challenge) व्हायरल होत आहे. हे चॅलेंज सध्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी पूर्ण केले आहे. याचे व्हिडिओही सध्या सोशल मिडियावर लोकांना आवडत आहेत. अशात मराठीच्या एका सुपरस्टारनेदेखील हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अजून एका सुपरस्टारने हे चॅलेंज हाणून पडले आहे. हे दोन स्टार्स आहेत स्वप्नील जोशी (Swapnil Joshiआ) णि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar).
सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिकेत सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्नील जोशी एकत्र काम करत आहेत. स्वप्नील जोशीने देखील हे चॅलेंज पूर्ण करण्याचा विचार केला होता. त्याने टेबलवर बॉटलवर ठेवली होती. स्वप्नील अगदी तयारी करत गोल फिरून पायाने झाकण पडण्याचा तयारीत असताना, तिथे सिद्धार्थ चांदेकर येऊन चक्क ती बॉटलच तिथून उचलून घेतो. मात्र त्यानंतर त्याच्या लक्षात आपली चूक लक्षात आल्यावर तो ती बाटली परत जागेवर ठेवतो आणि अशाप्रकारे स्वप्नील जोशीचे चॅलेंज पूर्ण होऊ शकत नाही.
View this post on Instagram
या दोघांसोबत अमृता खानविलकरनेही हे चॅलेंज यशस्वी पूर्ण करून दाखवले आहे. याआधी अक्षय कुमार, टायगर श्रॉफ ने हे चॅलेंज पूर्ण केले आहे. श्रेयस तळपदेनेदेखील याचा प्रयत्न केला होता. हॉलिवूड अभिनेता जेसन स्टेथम याने सोशल मीडियावर हे मजेशीर चॅलेंज सुरु केले होते त्याचे लोण आता सर्वत्र पोहचले आहेत.