Shahrukh Khan name on Burj Khalifa (Photo Credits: Instagram)

Cost of Name Display on Burj Khalifa:  बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा 2 नोव्हेंबर रोजी 55 वा वाढदिवस होता. दरवर्षी प्रमाणे यंदाही शाहरुख खानने अगदी धुमधडाक्यात आपल्या बर्थडेचे सेलिब्रेशन केले. वाढदिवसानिमित्त दुबईतील (Dubai) प्रसिद्ध बुर्ज खलीफा (Burj Khalifa) इमारतीवर त्याचा फोटो आणि नाव झळकले. शाहरुख प्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी बुर्ज खलीफाच्या मालकांनी हा विशेष निर्णय घेतला होता. (शाहरुख खान ला वाढदिवसाच्या दिवशी बुर्ज खलिफाकडून मिळाला 'हा' मोठा सन्मान; पहा व्हिडिओ)

शाहरुख खान प्रमाणे आपलेही नाव बुर्ज खलीफा इमारतीवर झळकावे, अशी अनेकांची इच्छा असेल. तुमचेही नाव बुर्ज खलीफा इमारतीवर झळकू शकते. पण ते नेमके साध्य कसे करायचे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठी तुम्हाला भलीमोठी किंमत मोजावी लागेल.

बुर्ज खलिफाच्या प्रकाशयोजना आणि प्रदर्शनाची व्यवस्था करणाऱ्या दुबईची बाजारपेठ संस्था Mullen Lowe MENA च्या 2019 च्या अहवालानुसार, या इमारतीवर आपले नाव प्रदर्शित करण्यासाठी 250,000 यूएई दिरहॅम म्हणजे 50,93,991.86 रुपये खर्च करावे लागतील. ही किंमत 50 लाखांपासून सुरू होते. वीकडेजला रात्री 8 ते १० दरम्यान आपला फोटो तीन मिनिटांसाठी प्रदर्शित करू शकता. या जाहिरातीसाठी तुम्हाला आठवड्याच्या शेवटी सुमारे 71,31,588.61 रुपये खर्च करावे लागतील.

पहा व्हिडिओ:

तीन मिनिटांच्या प्रदर्शनावर समाधानी नसल्यास कोणत्याही दिवशी रात्री 7 ते मध्यरात्री पर्यंत आपले नाव डिस्प्ले करु शकता. यासाठी तुम्हाला सुमारे 2 कोटी रुपये इतका खर्च करावा लागेल. दरम्यान, अनेकांसाठी ही किंमत मोठी असली तरी हौसेला मोल नाही. त्यामुळे काही इच्छुक पैसे खर्च करु शकतात. पण बुर्ज खलिफा इमारतीवर नाव पाहण्यासाठी खरंच इतका पैसा करायचा की बचत करायची हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.