Veteran Bhojpuri actor Brijesh Tripathi (PC - Twitter/@SAMTHEBESTEST_)

Brijesh Tripathi Passed Away: भोजपुरी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी (Brijesh Tripathi) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. वृत्तानुसार, ब्रिजेश त्रिपाठी यांना दोन आठवड्यांपूर्वी डेंग्यू झाला होता, ज्यासाठी त्यांना मेरठमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्याला मुंबईत आणण्यात आले. मात्र काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेत असताना अभिनेत्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ब्रिजेश त्रिपाठी यांचे कुटुंब मुंबईत राहत होते.

अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्तानंतर भोजपुरी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ब्रिजेश त्रिपाठी यांच्यावर आज, सोमवार, 18 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ब्रिजेश त्रिपाठी यांनी 46 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केलं. 1979 मध्ये 'सैया तोहरे करण' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. 1980 मध्ये आलेला 'टॅक्सी चोर' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. (हेही वाचा - Kajol's Mom Actress Tanuja Hospitalised: काजोलची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल)

भोजपुरी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही भूमिका केल्या होत्या. ब्रिजेश त्रिपाठी यांनी 'नो एन्ट्री', 'ओम', 'गुप्ता: द हिडन ट्रुथ', 'मोहरा', 'देवरा भैल दिवाना', 'हमार बॉडीगार्ड शिवा', 'ड्रायव्हर राजा', 'पिया चांदनी', 'राम कृष्ण बजरंगी' आणि 'जनता दरबार'सह इतर चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (हेही वाचा - Shreyas Talpade Health Update: हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने दिले अभिनेत्याच्या प्रकृतीसंदर्भात 'हे' अपडेट)

रवी किशन यांनी व्यक्त केला शोक -

ब्रिजेश त्रिपाठी यांनी अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये 250 हून अधिक चित्रपट केले. तसेच त्यांनी मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव, पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांच्यासह अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपट अभिनेते आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'आम्ही ब्रिजेश त्रिपाठीजींसोबत जवळपास 100 चित्रपट केले होते, त्यांचे जाणे म्हणजे भोजपुरी चित्रपटसृष्टीतून एका युगाचा निरोप आहे. ईश्वर त्यांच्या पुण्यवान आत्म्याला स्वर्गात सर्वोच्च सन्मान देवो.'