'उरी' सिनेमातील अभिनेता नवतेज हुंडल यांचे निधन
URi Actor Navtej Hundal (Photo Credits: Instagram)

विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' (Uri: The Surgical Strike) या सिनेमातील अभिनेता नवतेज हुंडल (Navtej Hundal) यांचे निधन झाले आहे. सिंटाने (CINTAA) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ट्विटमध्ये  नवतेज हुंडल यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली आहे. नवतेज यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण सिनेसृष्टीला जबर धक्का बसला आहे.

सिंटाने ट्विट करत नवतेज हुंडल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि पुढे लिहिले की, भगवान त्यांच्या आत्मास शांती देवो. त्याचबरोबर सिंटाच्या ट्विटमध्ये नवतेज हुंडल यांच्यावर मुंबईतील ओशीवारा क्रिमेटोरियम, रिलीफ रोड, प्रकाश नगर ज्ञानेश्वरनगर, जोगेश्वरी (पश्चिम) येथे सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार असल्याचीही माहिती दिली होती.

CINTAA ट्विट:

नवतेज हुंडल यांनी 'खलनायक' आणि 'तेरे मेरे सपने' या सिनेमांत काम केले होते. तर 'उरी' सिनेमात त्यांनी गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती. त्यांची मुलगी अवंतिका हुंडल देखील एक अभिनेत्री आहे.