Cannes 2022: नग्न अवस्थेत रेड कार्पेटवर पोहोचली युक्रेनियन महिला; शरीरावर लिहिलं होतं, 'आमचा बलात्कार थांबवा'
Ukrainian woman on red carpet (PC - Twitter)

Cannes 2022: पॅरिसमध्ये आयोजित 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) मध्ये चित्रपटसृष्टीशी निगडीत जगभरातील बड्या व्यक्ती हजेरी लावत आहेत. दरम्यान, युक्रेन (Ukraine) मधील महिलांवरील लैंगिक अत्याचाराकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी एका महिलेने कान्सच्या रेड कार्पेट (Red Carpet) वर नग्न अवस्थेत निदर्शने केली. यादरम्यान महिलेला हटवण्यासाठी सुरक्षा दलाला पुढे यावे लागले आणि तिला जबरदस्तीने रेड कार्पेटवरून हटवण्यात आले. या घटनेने तेथे उपस्थित असलेले सेलिब्रिटी आणि लोकही आश्चर्यचकित झाले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिलेने तिच्या संपूर्ण शरीरावर बॉडी पेंट केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिने पेंटसह शरीरावर संदेश देखील लिहिला आहे. जेव्हा ही महिला रेड कार्पेटवर नग्न अवस्थेत पोहोचली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला थांबवून कपडे घातले आणि तिला ओढून नेले. 17 मे पासून पॅरिसमध्ये 75 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. या आंदोलक महिलेने तिचे शरीर युक्रेनच्या ध्वजाच्या रंगात रंगवले होते. (हेही वाचा -Cannes 2022 Aishwarya Rai and Deepika Padukone Red Carpet Look: ऐश्वर्या राय आणि दीपिका पदुकोणच्या रेड कार्पेटवरील लुकने चाहत्यांना पाडली भुरळ; पहा खास फोटोज)

'आमच्यावर बलात्कार करणे थांबवा' -

महिलेच्या छातीवर आणि पोटावर 'आमच्यावर बलात्कार करणे थांबवा' असे लिहिले होते. याशिवाय महिलेच्या पाठीवर आणि पायावर रक्ताप्रमाणे लाल रंग दिसून आला. जे बलात्काराचे लक्षण आहे. जॉर्ज मिलरच्या थ्री थाउजंड इयर्स ऑफ लाँगिंगच्या प्रीमियरच्या वेळी ही घटना घडली. ज्यात इद्रिस एल्बा आणि टिल्डा स्विंटन यांच्या भूमिका आहेत. ही घटना घडली तेव्हा दिग्दर्शक आणि स्टार्स उपस्थित होते.

कान्स फिल्म फेस्टिव्हल हा जगातील सर्वात प्रतिष्ठित सिनेमा कार्यक्रमांपैकी एक आहे, जो दरवर्षी उन्हाळ्यात कान्स, फ्रान्समध्ये आयोजित केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील काही मोठ्या आणि समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांचे प्रीमियर आणि स्क्रीनिंग केले जाते.