सोशल मिडिया वर बरीच सक्रिय असलेली खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षयने आपल्यासाठी आणलेले अनपेक्षित गिफ्ट पाहून ती चक्रावून केली गेली होती. या हे अनपेक्षित गोष्ट होती कांद्याचे झुमके. गगनाला भिडलेले कांद्याचे भाव पाहता हे वस्तू आपल्या बायकोला नक्की आवडेल हा विचार करुन कपिल शर्माच्या शो मधून त्यानेही वस्तू आणली होती. त्याचा फोटो ट्विंकल खन्नाने शेअर केला होता. त्यानंतर त्या कानातल्यांचं काय झालं हे कोणालाही माहित नव्हतं मात्र ट्विंकलनं याचं उत्तर दिलं आहे.
चाहत्यांना या झुमक्याविषयी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर ट्विंकल ने आपल्या इन्स्टाअकाउंटवरून फोटो शेअर करुन दिले आहे.
ट्विंकल खन्ना ची पोस्ट:
हेदेखील वाचा- खिलाडी अक्षय कुमार ने पत्नी ट्विंकल खन्नासाठी आणले कांद्याचे झुमके; मजेशीर पोस्ट करत अभिनेत्री ने सांगितले यामागचे कारण
या फोटोमध्ये तिनं हे झुमके कानात घातलेले दिसत आहेत. या फोटोला तिनं एक गोड कॅप्शनही दिलं आहे. तिनं लिहिलं, एका शूटनंतर दुसरं शूट... पण मला आनंद वाटतो की तू ही मौल्यवान भेटवस्तू माझ्यासाठी आणलीस. त्यांना कोंब येण्याआधी ते घालण्याची संधी मला मिळाली. ट्विंकलच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
ट्विंकलनं शेअर केलेल्या पोस्टमधील एका फोटोमध्ये ट्विंकलनं हे झुमके घातलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये या झुमक्यातील एका कांद्याला कोंब आलेला दिसत आहे.