
Ranya Rao First Statement After Arrest: सध्या सर्वेत्र कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) चे नाव चर्चेत आले आहे. रान्यावर दुबईहून 14.8 किलो सोन्याची तस्करी (Gold Smuggling) केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर, रान्याला पोलिस कोठडीत घेण्यात आले. सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आलेल्या रान्या राव हिच्या अटकेनंतर तिचे पहिले विधान समोर आले आहे. रान्याने पोलिसांना सांगितले की, तिच्या शरीरावर 17 सोन्याच्या बार होत्या. यासोबतच, राण्याने तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहितीही पोलिसांना दिली आहे. तिने आपल्या जवाबात म्हटले आहे की, 'मी युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेचा प्रवास केला आहे आणि दुबई, सौदी अरेबियाला भेट दिली आहे. सध्या मी थकली आहे कारण मला पुरेशी विश्रांती मिळाली नाही. रान्याने सांगितले की, ती रिअल इस्टेट व्यावसायिक के. एस. हेगदेश यांची मुलगी असून तिचे पती जतिन हुक्केरी एक आर्किटेक्ट आहेत.
दरम्यान, राण्या रावनेही तिचा गुन्हा कबूल केला आहे. रान्या रावने तिच्या जबाबात महसूल गुप्तचर संचालनालयाला असेही सांगितले की, तिने केवळ दुबईच नव्हे तर युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेलाही प्रवास केला होता. तथापी, अभिनेत्रीने असेही उघड केले की, तिने कोणत्याही दबावाखाली तिचे म्हणणे सांगितलेले नाही. कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बेंगळुरू विमानतळावर कोट्यवधी रुपयांच्या सोन्यासह अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) करत आहे. (हेही वाचा - Actress Ranya Rao Arrested in Bengaluru: वडील IPS ऑफिसर पण मुलगी निघाली स्मगलर; बंगळुरु विमानतळावर अभिनेत्री रान्या राव हिस अटक)
अभिनेत्रीजवळ सापडले 14 किलो सोने -
बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिनेत्री रान्या रावकडून सुमारे 14 किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे 12.56 कोटी रुपये आहे. बेंगळुरूमधील त्याच्या घराची झडती घेतली असता अधिकाऱ्यांना 2.06 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. (हेही वाचा, Mumbai: गुप्तांगातून सोन्याची तस्करी करणाऱ्या 3 महिलांना मुंबई विमानतळावरून अटक)
तथापि, डीआरआय अधिकाऱ्यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, रान्या राव ही मोठ्या तस्करी नेटवर्कचा भाग होती का? हे शोधण्यासाठी 9 मार्चपासून तीन दिवस तिची चौकशी करण्याची परवानगी द्यावी. डीआरआयने म्हटले आहे की, अलिकडच्या काळात बेंगळुरू विमानतळावर जप्त केलेल्या सोन्याच्या सर्वात मोठ्या जप्तींपैकी हा एक आहे. (हेही वाचा, मुंबई: चप्पलमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या एकाला विमानतळावरुन अटक)
रान्या राव वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मुलगी -
रान्या राव ही वरिष्ठ पोलिस अधिकारी के रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी तिने दुबईला 30 हून अधिक लहान ट्रिप केल्या. तसेच विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या नियमित तपासणी टाळण्यासाठी तिच्या सावत्र वडिलांच्या व्हीआयपी सुविधांचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तथापि, के रामचंद्र राव यांनी तिच्या कारवायांशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले आहे.