Sunny Leone ने असा साजरा केला नाताळ चा सण; पाहा फोटो
Sunny Leone (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा नवरा डॅनियल वेबर यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने एक फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी आणि डॅनियल यांनी मुलगी निशा व ट्विन्स नोहा आणि आशर यांच्यासोबत पोझ दिली आहे. एका फोटोमध्ये सनी, डॅनियल आणि त्यांची तीन मुले आपल्या आजीबरोबर पोज करताना दिसत आहेत. त्या प्रत्येकाने रेड ख्रिसमस जंपर्स घातले आहेत आणि त्याला शोभेल असा पायजमा घातला आहे. इतर दोन फोटोंमध्ये सनी आणि डॅनियल खूपच गोड पोज देताना दिसत आहेत, डॅनियलने अगदी एका फोटोत सनीला हातात उचलून घेतलं आहे.

या फॅमिलीने संपूर्ण घर सजवलेले दिसत आहे. तसेच त्यांच्या मागे एक ख्रिसमस ट्री देखील सजवलेली दिसत आहे. तिन्ही मुले त्यांच्या खेळन्यायसोबत व गिटार सोबत खेळताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

Merry Christmas from the Weber’s!! Thank you @ursa.co for making our family the cutiest Christmas pajamas ever! @dirrty99

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लवकरच ऑल्ट बालाजीच्या रागिनी एमएमएस या वेब सीरिज  मध्ये एक विशेष भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने एका मुलाखतीत म्हटले आहे की, “एकताबरोबर काम करण्यापूर्वी, आम्हा दोघांनाही ठाऊक होतं की आम्ही नक्कीच पुन्हा काम करू इच्छितो... आमच्या दोघींची खूप चांगली मैत्री आहे."

Google Trends 2019 ने दुर्लक्ष करूनही, Sunny Leone ठरली गुगलवर सर्वात जास्त सर्च झालेली सेलिब्रिटी

दिवाळीच्या सुट्टीच्या काळात सनी आणि तिच्या कुटुंबीयांनी अशाच प्रकारचे फोटो शेअर केले होते. तीन मुलं वाढवण्याविषयी विचारल्यावर डॅनियलने हिंदुस्तान टाईम्सला एका मुलाखतीत सांगितले होते की, “एकटं मुल असो वा तीन मुलं असोत, ही खूप मोठी जबाबदारी असते!”