Adah Sharma Announce Break: 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माने घेतला अभिनयापासून ब्रेक, जाणून घ्या काय आहे कारण
Adha Sharma (Photo Credit - Twitter)

'द केरळ स्टोरी' अभिनेत्री अदा शर्माची (Adah Sharma) प्रकृती काही दिवसांपासून ठीक नाही. अन्नाची अ‍ॅलर्जी आणि अतिसाराच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आता स्वत: अभिनेत्रीने तिला आरोग्याची समस्या असल्याची पुष्टी केली आहे. यामुळे आता अडाला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. अदाने सांगितले की तिच्या संपूर्ण शरीरावर पुरळ आले आहेत. अशा परिस्थितीत तिला आता कामातून ब्रेक घ्यावा लागणार आहे. अदाने तिच्या अ‍ॅलर्जीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी एक दीर्घ पोस्टही लिहिली आहे. (हे देखील वाचा: Chandramukhi 2: कंगना राणावतचा 'चंद्रमुखी 2'मधील फर्स्ट लूक आऊट, हटके लुकने वेधले सर्वांचे लक्ष्य)

अदा शर्माने अ‍ॅलर्जीचे फोटो केले इंस्टाग्रामवर शेअर

अदा शर्माने इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत मोठी नोट लिहिले आहे की, "त्या सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी मला काळजीने मेसेज केले. तिने तिच्या फोटोंसह डिस्क्लेमर दिला, त्वचेवर अ‍ॅलर्जीचे फोटो पाहून घाबरत असाल तर स्वाइप करू नका. हे थोडे भयानक आहे आणि मला वाटते की फक्त इंस्टाग्रामवर चांगलेच फोटो का पोस्ट करावे." पुढे तीने लिहिले आहे की, "हे एक भयानक प्रकारचे पुरळ आहेत. जे मी फुल स्लीव्ह कपडे घालून लपवत होते पण तणावामुळे ते आता माझ्या चेहऱ्यावर दिसू लागले आहे. यासाठी मी औषध घेतले आणि मला औषधाची ऍलर्जी असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे माझी तब्येत अजून बिघडली. त्यामुळे आता मी इतर औषधे आणि इंजेक्शन घेत आहे."

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

'कमांडो' ही वेबसिरीज 11 ऑगस्टला होणार प्रदर्शित

कमांडो ही वेब सीरिज 11 ऑगस्ट रोजी Disney Plus Hotstar  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'कमांडो' ही वेब सीरिज 'कमांडो' फ्रँचायझीमधील आहे. 'कमांडो' फ्रँचायझीचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. या चित्रपटांची निर्मिती विपुल शाह यांनी केली आहे. कमांडो फ्रँचायझीची सुरुवात 2013 मध्ये 'कमांडो: ए वन मॅन आर्मी' या चित्रपटानं झाली, ज्यामध्ये विद्युत आणि पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत होते. आता प्रेम आणि अदा 'कमांडो' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहेत.