दिग्दर्शक व्यंकट प्रभू (Venkat Prabhu) आणि थलपथी विजय (Thalapathy Vijay) यांनी त्यांचा आगामी चित्रपट 'GOAT' च्या टीमसह दिवंगत अभिनेते-राजकारणी विजयकांत यांच्या निवासस्थासास भेट दिली. या वेळी त्यांनी विजयकांत (Vijayakanth Cameo) यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत आगामी उपक्रमासाठी त्यांचे आशीर्वादही घेतले. आपल्या चाहत्यांमध्ये प्रेमाने ‘कॅप्टन’ म्हणून ओळखला जाणारे विजयकांत या चित्रपटात एआय तंत्रज्ञानाच्या (AI Technology) माध्यमातून खास भूमिका साकारणार आहेत. या कॅमिओसाठी विजयकांत यांच्या पत्नी, राजकारणी प्रेमलता विजयकांत यांच्याकडून अधिकृत परवानगीही मागण्यात आली होती.
'GOAT' साठी AI तंत्रज्ञानाचा वापर
देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) पक्षाच्या अध्यक्षा प्रेमलता यांनी एका मुलाखतीत याबाबत यापूर्वी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, "वेंकट प्रभू यांनी आमच्या निवास्थानास चार ते पाच वेळा भेट दिली. माझा मुलगा षणमुगपांडियन यांच्याशी त्यांची अनेक वेळा चर्चा झाली. शेवटी त्यांनी मला भेटण्याची विनंती केली. नुकत्याच एका निवडणुकीच्या प्रचारासाठी चेन्नई दौऱ्यादरम्यान आम्ही भेटलो आणि प्रकल्पावर चर्चा केली. वेंकट प्रभू यांनी स्पष्ट केले की, त्यांना 'GOAT' साठी AI तंत्रज्ञानाचा वापर करून कॅप्टन [विजयकांत] ला परत आणायचे होते. त्यांनी आमची परवानगी मागितली आणि विजयने मला प्रत्यक्ष भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आम्ही भेटलो आणि चित्रपटाचा पुढील प्रवास सुरु झाला. (हेही वाचा, Thalapathy Vijay Announces Political Party: दाक्षिणात्य अभिनेता थलापथी विजयने ठेवलं राजकारणात पाऊल; Tamilaga Vettri Kazhagam पक्षाची केली घोषणा)
थलपथी विजय यांचा 68 वा चित्रपट
व्यंकट प्रभू दिग्दर्शित, 'GOAT' हा थलपथी विजयचा 68 वा चित्रपट आहे. ज्यात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट सप्टेंबर 2024 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या तयारीत असताना, चाहत्यांमध्ये उत्साह वाढत आहे. विशेषत: विजयकांतच्या AI-शक्तीच्या कॅमिओच्या समावेशामुळे, ज्यामुळे चित्रपटाला एक नॉस्टॅल्जिक टच मिळत असल्याने चाहत्यांच्या आपेक्षा वाढल्या आहेत.
व्यंकट प्रभू यांची सोशल मीडिया पोस्ट
व्यंकट प्रभू यांनी विजयकांत यांच्या निवास्थानाच्या भेटीचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर सोमवार, 19 ऑगस्ट रोजी शेअर केले. जे पुढच्या काहीच काळात व्हायरल झाले. प्रभू यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये दिवंगत अभिनेता, राजकारणी विजयकांत यांच्याबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या. (हेही वाचा, The Greatest of All Time: थलपथी विजयचा नवा चित्रपट पोंगल 2025 ला होणार रिलीझ, दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी दिली माहिती)
With all the blessings of our #Captain 🙏🏽🙏🏽🙏🏽 #TheGreatestOfAllTime pic.twitter.com/rEZsbwUrTW
— venkat prabhu (@vp_offl) August 19, 2024
विजयराज अलगरस्वामी अभिनय क्षेत्रात विजयकांत नावाने ओळखले जात. त्यांनी भारतीय अभिनयसृष्टीमध्ये प्रदीर्घ वाटचाल केली. खास करुन तेलुगू चित्रपटविश्वात त्यांचे काम मोलाचे आहे. 25 ऑगस्ट 1952 मध्ये जन्मलेल्या विजयकांत यांचे 28 डिसेंबर 2023 मध्ये निधन झाले. ते केवळ अभिनेताच नव्हते तर ते चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, परोपकारी आणि राजकारणीही होते. 27 मे 2011 ते 21 फेब्रुवारी 2016 पर्यंत त्यांनी तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.