तैमुर ने आई करीना कडून आपल्या तिस-या वाढदिवसानिमित्त मागितले 'हे' अनोखे गिफ्ट, ऐकून तुम्हालाही हसू होईल अनावर
तैमूर अली खान (Photo Credits : Instagram)

बॉलिवूडची अशी एक हॉट जोडी करीना कपूर (Kareena Kapoor)आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) या दोघांपेक्षा त्यांचा मुलगा तैमुरचं (Taimur) सर्वांचा चर्चेचा विषय ठरला. त्याच्या जन्मापासून ते आतापर्यंत तो नेहमीच मिडियाच्या लाईमलाइटमध्ये राहिला आहे. त्याच्या हसण्यापासून ते त्याच्या रडण्यापर्यंत सर्व गोष्टी मिडिया कॅप्चर करत राहिला. जन्माआधीच प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या तैमुरचा 20 डिसेंबर 2016 ला जन्म झाला आणि सर्व मिडियाला तैमुरने अक्षरश: वेडं लावलं. यंदा त्याचा तिसरा वाढदिवस होणार आहे. हा वाढदिवस मुंबईत साजरा होणार असून या वाढदिवसासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. या वाढदिवसाचे आकर्षण म्हणजे या वाढदिवसानिमित्त तैमुरने आपल्या आई करीनाकडे एक अनोखे गिफ्ट मागितले आहे.

बॉलिवूड लाइफ डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये करिनाने तैमुरचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी सुरु असल्याचं म्हटलं आहे. यंदाच्या वाढदिवसासाठी तैमुरने एक खास गिफ्ट मागितल्याचेही करिनाने सांगितलं आहे. या वाढदिवसानिमित्त “मला यंदा दोन केक कापायचे आहेत, असं तैमुरने करीनाला सांगितले आहे. त्यापैकी एक केक हा हल्कचा (सुपरहिरो) असेल तर दुसरा सांताक्लॉजचा असेल. दोन केक का कापायचे आहेत असं त्याला विचारलं असता तो मला दोघेही खूप आवडतात असं तो सांगतो,” अशी माहिती करिनाने वाढदिवसाबद्दल बोलताना दिली. Taimur Ali Khan 2nd Birthday Celebration: दक्षिण आफ्रिकेमध्ये 'असं' सुरू आहे तैमुरच्या Birthday चं सेलिब्रेशन! (Photo)

वाढदिवसानिमित्त काय विशेष असेल असं करिनाला विचारण्यात आलं असता तिने कुटुंबातील सर्व लोक एकत्र येऊन वाढदिवस साजरा करतील असं सांगितलं. “मी आणि सैफ एका जाहिरातीच्या शूटींगमध्ये व्यस्त असणार आहोत. मात्र संध्याकाळी कुटुंबियांबरोबर आम्ही सर्वजण तैमुरचा वाढदिवस साजरा करु. यावेळी कुटुंबियांबरोबरच तैमुरच्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणिंना आम्ही आमंत्रित करणार आहोत,” असं करिना म्हणाली.

अगदी जन्मापासून स्टारडम मिळालेल्या तैमुरच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. त्यात सोशल मिडियावर तैमुर हा तर आकर्षणाचे केंद्र बनला आहे. त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष जाणे स्वाभाविकच आहे. त्यात आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती त्याच्या तिस-या वाढदिवसाची.